शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

यंदा विशिष्ट परीक्षा केंद्रावर संपूर्ण वेळ राहणार ‘बैठे पथक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 05:00 IST

परीक्षा दालनात गैरप्रकार निदर्शनास आल्यास पथकाने त्याची नोंद घेऊन केंद्र संचालकाच्या निदर्शनास आणावी. आवश्यक त्या सूचना पोलिसांना देण्यात येतील. परीक्षा केंद्राच्याबाहेर कॉपी पुरविणाऱ्यांचा घोळका असेल तर त्यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला जाणार आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात एकही उपद्रवी केंद्र नाही : कॉपीमुक्त अभियानाचा संकल्प

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या माध्यमिक, उच्च माध्यमिक परीक्षेत कॉपीसारखा गैरप्रकार होऊ नये,यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समितीची नियुक्त केली जाते. त्याच मंडळामार्फत शिक्षणाधिकारी माध्यमिक व प्राथमिक व निरंतर शिक्षण यांच्या अधिपत्याखाली भरारी पथके तयार केली जातात. परंतु या भरारी पथकापैकी एक भरारी पथक विशिष्ट केंद्रावर एखाद्या पेपरच्यावेळी पूर्णवेळ थांबून (बैठे पथक) परीक्षेतील गैरप्रकार टाळतील.काही परीक्षा केंद्राच्या संपूर्ण परिसराचे व्हिडीओ चित्रीकरण करणार आहेत.१८ फेब्रुवारीपासून तर १८ मार्च २०२० दरम्यान इयत्ता १२ वी च्या परीक्षा घेण्यात येत आहेत. त्या परीक्षेत कॉपीसारख्या गैरप्रकार टाळण्यासाठी बैठे पथक विशिष्ट शाळेत पेपरच्या संपूर्ण वेळेत बसेल. त्या बैठे पथकात कमीत कमी ४ सदस्य असतील. त्यातील दोन सदस्य प्रत्येक परीक्षा ब्लॉकमधून फेरी मारतील. तर दोन सदस्य परीक्षा केंद्राच्या आवारातून फेरी मारतील.यातील पथक प्रमुख आपल्या सोयीनुसार सदस्यांची संख्या ठरवतील. परीक्षा दालनात गैरप्रकार निदर्शनास आल्यास पथकाने त्याची नोंद घेऊन केंद्र संचालकाच्या निदर्शनास आणावी. आवश्यक त्या सूचना पोलिसांना देण्यात येतील. परीक्षा केंद्राच्याबाहेर कॉपी पुरविणाऱ्यांचा घोळका असेल तर त्यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला जाणार आहे. पथकातील सदस्य परस्पर विद्यार्थ्यांना किंवा पर्यवेक्षकांना परस्पर सूचना देणार नाहीत.त्या सूचना केंद्र संचालक किंवा उपकेंद्र संचालक यांच्या मार्फत देतील. विद्यार्थ्यांना पेरपर लिहिण्यात अथवा परीक्षा संचालनात अडचण होणार नाही याची खबरदारी या पथकालाही घ्यावी लागेल. प्रश्नपत्रिका शाळेतच उघडली जाईल. यंदा दहावी किंवा बारावीचा एकही उपद्रवी केंद्र जिल्ह्यात नाही.बोर्डाकडून सहा भरारी पथकबोर्डाकडून दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी सहा भरारी पथक तयार करण्यात आले. त्यात माध्यमिक शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, डायट प्राचार्य, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी निरंतर व विशेष महिला पथक असे सहा पथक तयार करण्यात आले. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती असून त्यात जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, मुकाअ डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक, निरंतर यांचा समावेश आहे. तालुका स्तरावर दक्षता समितीत उपविभागीय अधिकारी किंवा तहसीलदार, गटविकास अधिकारी व सदस्य सचिव गटशिक्षणाधिकारी यांचा समावेश असणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी सुनील मांढरे यांनी दिली आहे.७४ केंद्रावरून २१४६९ विद्यार्थी देणार परीक्षागोंदिया जिल्ह्यात बारावीचे ७४ केंद्र असून या केंद्रावरून २१ हजार ४६९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. १८ फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा सुरू होत आहे. इयत्ता दहावीची परीक्षा ३ मार्चपासून सुरू होत असून १०१ केंद्रांवरून २३ हजार ४१९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

झेरॉक्स सेंटरवर करडी नजरपरीक्षा केंद्राच्या परिसरात परीक्षेच्या वेळी सुरू राहणाºया झेरॉक्स सेंटरवर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी दिले आहेत. सोबत परीक्षा शांततेत व कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठी नेहमीप्रामणे यंदाही कलम १४४ लागू करण्यात आली आहे.

टॅग्स :examपरीक्षा