शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
5
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
6
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
7
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
8
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
9
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
11
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
12
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
13
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
14
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
15
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
16
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
17
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
18
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
19
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
20
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
Daily Top 2Weekly Top 5

साहेब,रंगाचेही पैसे निघाले नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 05:00 IST

साधारणत: दहा हजार रुपये किमतीच्या शंभर मूर्त्या तयार करताना किमान तीन हजार रुपये केवळ रंगासाठी खर्च येतो. त्यावर महिनाभरापासून मूर्तिसाठी माती तयार करणे तिला मूर्त रुप देणे यासाठी भरपूर परिश्रम घ्यावे लागते. पूर्ण मूर्त्या विकल्या तरी ग्रामीण भागात फारसा लाभ मिळत नाही. त्यावर यंदा मूर्त्या विक्री झाल्या नाही त्यामुळे कर्जबाजारी होण्याची वेळ आली.

ठळक मुद्देमूर्तिकारांनी मांडली व्यथा : कोरोनाचा बसला फटका

विजय मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : कोरोनामुळे आधीच बेरोजगारी संकट असतान ऐन जन्माष्टमीच्या दिवशी सालेकसा शहरात जनता कर्फ्यू लागू करण्यात आला. याचा कान्होबाच्या मूर्त्यांची विक्री करणाऱ्या मूर्तिकारांना फटका बसला. दिवसभरात दरवर्षीच्या तुलनेत यंदा पाच टक्के सुध्दा मूर्त्या विकल्या नाहीत. यामुळे येथील कुंभार समाज चांगलाच आर्थिक अडचणीत आला. यंदा मूर्ती रंगविण्यासाठी लागलेला रंगाचा खर्च सुद्धा निघाला नाही. असे पाणावलेल्या डोळ्यांनी मूर्तिकारांनी सांगितले.सालेकसा शहरात दहा ते बारा कुंभार समाजाच्या कुटुंबाचे वास्तव्य आहे. आपल्या मुला-बाळांसह विविध सण उत्सवच्या प्रसंगानुरुप मूर्त्या घडविण्याचे काम ते करतात. तसेच इतर वेळी माठ व इतर जीवनोपयोगी वस्तू तयार करतात. यातील काही माल घरुन विक्री होते तर काही मालाच्या विक्रीसाठी बाजारात दुकाने लावतात. तर काही लोक गावागावात भ्रमण करीत आपल्या मालाची विक्री करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. यंदा कोरोनामुळे कुंभार बांधवाच्या व्यवसायावर सुद्धा मोठा परिणाम झाला आहे. कुंभाराने तयार केलेल्या वस्तुंच्या विक्रीत विक्रमी घट झाली आहे. अशात कुंभार समाजबांधावर उपासमारीचे संकट ओढावले आहे. श्रद्धेने दरवर्षी जन्माष्टमी निमित्त कान्होबाची घरी स्थापना करणारे भाविक यंदाही आपल्या घरी कान्होबाची स्थापना करतील या अपेक्षेने कुंभार समाज बांधवानी कुणी दोनशे तर कुणी चारशे मूर्त्या तयार केल्या. मात्र मूर्त्या विकण्यासाठी गावात फिरताच आले नाही. त्यामुळे मूर्ती विक्रीचे प्रमाण आधीच निम्यावर आले.मूर्तिकार जन्माष्टमीच्या दिवशी एक दिवस आधीपासून गांधी चौकात कान्होबाच्या मूर्त्या विक्री करण्यासाठी बसतात. यंदाही मूर्ती विकायला बसले. परंतु दुदैव असे की ऐन जन्माष्टमीच्या दिवशीच सालेकसात जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आणि सालेकसात संपूर्ण बाजारपेठ बंद झाली. जनता कर्फ्यूमुळे बाहेर गावातील भाविक मूर्ती घेण्यासाठी सालेकसा शहरात आलेच नाही. सालेकसा येथील लोकही घराबहेर पडले नाही.शहरात सर्वत्र शुकशुकाट असताना मूर्तिकार आपल्या कान्होबाच्या मूर्त्या विक्रीसाठी चौकात ठेवून दिवसभर ग्राहकांची वाट बघत राहीले. परंतु मूर्ती घेणारे ग्राहक आले नाही. त्यामुळे मूर्ती विकणाºया प्रत्येक मूर्तिकारांच्या चेहºयावर नैराश्य दिसून येत होते.३० टक्के खर्च रंगासाठीश्यामबाई वघाडे नावाच्या महिला मूर्तिकारासोबत लोकमत प्रतिनिधीने संवाद साधला असता साधारणत: दहा हजार रुपये किमतीच्या शंभर मूर्त्या तयार करताना किमान तीन हजार रुपये केवळ रंगासाठी खर्च येतो. त्यावर महिनाभरापासून मूर्तिसाठी माती तयार करणे तिला मूर्त रुप देणे यासाठी भरपूर परिश्रम घ्यावे लागते. पूर्ण मूर्त्या विकल्या तरी ग्रामीण भागात फारसा लाभ मिळत नाही. त्यावर यंदा मूर्त्या विक्री झाल्या नाही त्यामुळे कर्जबाजारी होण्याची वेळ आली असल्याचे सांगितले.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सव