शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
4
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
5
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
6
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
7
'राजा शिवाजी'मध्ये विद्या बालनच्या जागी दिसली असती 'ही' अभिनेत्री, मात्र दिला नकार; कारण...
8
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
9
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
10
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
11
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
12
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
13
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
14
आसाम, बंगालमधील विजयानंतर भाजपा ‘या’ राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत? बड्या नेत्याने दिले संकेत
15
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
16
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
17
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
18
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
19
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
20
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

वेगवेगळ्या संस्थेच्या नावाने एकच कोटेशन

By admin | Updated: December 29, 2014 23:46 IST

सडक/अर्जुनी तालुक्यात तयार करण्यात आलेल्या वनतळीचे एकच कोटेशन वेगवेगय्या संस्थेच्या नावाने तयार करण्यात आले. ज्या संस्थांच्या नावाने कोटेशन तयार करण्यात आले

सौंदड : सडक/अर्जुनी तालुक्यात तयार करण्यात आलेल्या वनतळीचे एकच कोटेशन वेगवेगय्या संस्थेच्या नावाने तयार करण्यात आले. ज्या संस्थांच्या नावाने कोटेशन तयार करण्यात आले त्या संस्था अस्तित्वातच नसल्याचेही बोलले जाते.वनतलावाचे बांधकामाचे इस्टीमेटला जे कोटेशन जोडले गेले ते कोटेशन एकाच व्यक्तिने वेगवेगळ्या कर्फच्या नावाने एकाच हस्ताक्षरात व एकाच तारखेला पुरविलेले आहेत. यात माती कामाचे जे कोटेशन जोडले आहे त्यात सिओटी, हर्टिंग झोन, व केसींग झोनकरीता कोणत्याच काळ्या मातीचा पुरवठाच झालेला नाही. दुसऱ्या कोटेशनमध्ये मिक्सर मशीन, व्हायब्रेट मशीन सेटिंग व पाणी टँकर आदी साधनाचा वापर केल्याचे दाखविण्यात आले आहे. परंतु प्रत्यक्ष अशा कोणत्याही साधनाचा वापर करण्यात आला नाही. तिसरा कोटेशन लोखंड, सिमेंट पुरविण्याबाबत जोडला आहे. परंतु या वनतलावाच्या बांधकामात फक्त रपट्याकरीता सिमेंटचा वापर करण्यात आला आहे. लोखंड सळाखींचा वापर करण्यात आला नाही. या सर्वांचा बिल मात्र मंजूर करण्यात आले. सडक/अर्जुनीचे वनपरिक्षेत्राधिकारी तांत्रिक सल्लागार प्रत्यक्ष पाहणी केली. परंतु कंत्राटरांशी संगणमत असल्यामुळे त्यांनी बिल काढले. वरिष्ठ पातळीवरुन या प्रकरणाची कोणतीही दखल घेतली गेली नाही. क्षेत्र सहायक कोसमतोंडी अंतर्गत मालीजुंगा येथे वनतळी बांधण्यासाठी शासनाकडून मंजुरी मिळाली. शासकीय मंजुरी १० फेब्रुवारी २०१२ ची आहे. या कामाचा कार्यारंभ आदेश क्र. १४५/२७/०२/२०१२ असून हे संपुर्ण काम मग्रारोहयो योजनेंतर्गत मंजुर करण्यात आले होते. परंतु वन अधिकाऱ्यांनी नियमाला धाब्यावर ठेवून खाजगी कंत्राटदाराकडून जेसीबी मशीन व ट्रॅक्टरद्वारे काम करण्यात आले. यासाठी ८ लाख ४२ हजार ३९० रुपयाचा निधी ही मंजूर झाला होता. वनतलावांच्या कामात मातिकामाचे खोटे हजेरी पत्रक तयार करुन ३ लाख ३२ हजार ९० रुपयाची उचल करण्यात आली आहे. कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी मालीजुंगा येथील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)