शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

सुकडीत २७ जोडप्यांचे शुभमंगल

By admin | Updated: April 29, 2016 01:48 IST

एकीकडे सामूहिक विवाह सोहळ्यांमध्ये विवाह करणाऱ्या जोडप्यांची संख्या कमी होत असताना सुकडीसारख्या लहान गावात ही संख्या वाढत आहे.

सर्वधर्र्मीय सामूहिक विवाह : सामाजिक बांधिलकी जोपासणारी ११ वर्षांची परंपरागोंदिया : एकीकडे सामूहिक विवाह सोहळ्यांमध्ये विवाह करणाऱ्या जोडप्यांची संख्या कमी होत असताना सुकडीसारख्या लहान गावात ही संख्या वाढत आहे. चक्रधर स्वामींच्या या पावन भूमित सर्व जातीधर्माच्या जोडप्यांचे विवाह एका मंडपात करण्याची ही परंपरा सामाजिक बांधीलकी जोपासणारी आहे. यातून सामाजिक सलोखा वाढण्यास मदत होत असून असंख्य गोरगरीबांचे लग्न थाटामाटात लावले जात असल्यामुळे त्यांचे आशीर्वाद मिळत आहेत. अशा उपक्रमासाठी खा.प्रफुल्ल पटेल यांच्यासह आमच्या सर्वांच्या मनापासून शुभेच्छा आहेत, अशा शब्दात मनोहरभाई पटेल अकादमीच्या अध्यक्ष वर्षा पटेल आणि आ.राजेंद्र जैन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.सुकडी डाकराम येथे बुधवारी सायंकाळी भरगच्च नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या सर्वधर्मिय सामूहिक विवाह सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अत्यंत उत्साहात पण तेवढ्याच शिस्तबद्धरित्या पार पडलेल्या या सामूहिक विवाह सोहळ्यात हिंदू धर्मिय १९ आणि बौद्ध धर्मिय ८ जोडप्यांचे शुभमंगल झाले. विशेष म्हणजे त्यात २ आंतरजातीय विवाहसुद्धा होते. या सोहळ्याला अतिथी म्हणून आ.राजेंद्र जैन, वर्षा पटेल, मुख्य आयोजक माजी आ.दिलीप बन्सोड, माजी आ.भजनदास वैद्य, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष के.आर.शेंडे, म्हाडाचे माजी सभापती नरेश माहेश्वरी, माजी जि.प.उपाध्यक्ष पंचम बिसेन, मदन पटले, जिल्हा बँकेचे संचालक राधेलाल पटले, जि.प.सदस्य मनोज डोंगरे, जि.प.सदस्य पटले, गोरेगाव पं.स.सदस्य केवलराम बघेले, डॉ.नामदेव किरसान, पंचायत समिती सभापती शकुंतला परतेकी, अदानी फाउंडेशनचे सुबोधसिंग, तसेच श्रीकृष्ण धर्म व पारमार्थिक आयोजन समितीचे पदाधिकारी प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते. चक्रधारी स्वामीच्या मठ परिसरात उभारलेल्या भव्य शामियान्यात सायंकाळी ५ वाजता या विवाह सोहळ्यास सुरूवात झाली. सुरूवातीला या सोहळ्याचे मुख्य आयोजक माजी आ.दिलीप बन्सोड यांनी प्रास्ताविकातून ११ वर्षापासून सुरू असलेल्या या उपक्रमाची माहिती दिली. सर्वांच्या सहकार्यातून ही परंपरा अविरतपणे सुरू ठेवणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. महानुभवाव पंथाचे प्रमुख साळकर बाबा यांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले की, ८०० वर्षापूर्वी हे मंदिर तयार झाले. येथे पूर्वी फक्त दुखी कष्टी लोकच येत होते. पण गोरगरीबांचे विवाह होत नव्हे. पण आज अशा सर्वधर्मिय विवाह सोहळ्यातून गोरगरीबांच्या संसाराची सुरूवात होत आहे ही गोष्टी फार महत्वाची असल्याचे ते म्हणाले. या विवाह सोहळ्यानंतर संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन त्याच ठिकाणी केले होते. हजारो वऱ्हाडाने शांततेत भोजन ग्रहण केले. (जिल्हा प्रतिनिधी)प्रत्येक जोडप्याला मिळाल्या भेटवस्तूया सोहळ्यात एकूण २६ जोडप्यांची नोंदणी झाली होती. मात्र सर्व तयारीनंतर आलेल्या एका जोडप्यालाही समाविष्ठ करण्यात आले. ठरल्यानुसार त्या सर्व जोडप्यांना आलमारी, पलंग, गादी यासह इतर संसारोपयोगी १२ वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या. या वस्तूंसाठी माजी आ.दिलीप बन्सोड, अर्चनाताई बन्सोड यांच्यासह बबनदास रामटेके, अमृतलाल असाटी, राजेंद्र अग्रवाल, चंद्रशेखर गजभिये, शतुंतला परतेकी, जगन धुर्वे, राजेश कटरे, गजानन नंदागवळी तसेच अदानी फाऊंडेशनच्या वतीने मदत करण्यात आली.