शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
4
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
5
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
6
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
7
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
8
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
9
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
10
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
11
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
12
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
13
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
15
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
16
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
17
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
18
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
19
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
20
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
Daily Top 2Weekly Top 5

आमगावात मतदारसंघात उत्सुकता शिगेला

By admin | Updated: October 18, 2014 23:27 IST

आमगाव-देवरी या राखीव मतदार संघातील मतदानानंतर विजयाचा हक्क सांगणारे उमेदवार व कार्यकर्ते कोड्यात पडले आहेत. विजयाची अनश्चितता असल्यामुळे सर्वांमध्येच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

आमगाव : आमगाव-देवरी या राखीव मतदार संघातील मतदानानंतर विजयाचा हक्क सांगणारे उमेदवार व कार्यकर्ते कोड्यात पडले आहेत. विजयाची अनश्चितता असल्यामुळे सर्वांमध्येच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. प्रशासनाने मतमोजणीसाठी चोख बंदोबस्त केला आहे. आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्र राखीव मतदारसंघ असल्याने उमेदवारांना मतदारांकडून प्रोत्साहन मिळविण्यासाठी कसरत करावी लागत होती. परंतु बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे राजकीय पक्षांसह उमेदवारांना संजीवनी मिळाली. मतदार संघात मतदानासह विजयाचे चित्रच बदलण्याची शक्यता आहे.या मतदार संघात तीन तालुक्यातील ३०२ मतदान केंद्रांवर ६९.६२ टक्के मतदान झाले. आठ उमेदवारांनी विजयाचे स्वप्न पाहीले आहे. परंतु मतदानानंतर सर्वांचेच गणित चुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षातील विजयाचे दावे मागे पडू शकतात. मतदारसंघात राष्ट्रीय काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात विजयासाठी चुरस आहे. विजयाचे गणित बदलण्यासाठी शिवसेना, बसपा व अपक्ष यांच्या मतांना अधिक बळ आले आहे. मतमोजणीसाठी एक हजार कर्मचारी दाखल झाले आहेत. मतमोजणी १४ टेबलांवर पूर्ण होणार असून २२ फेऱ्या होणार आहेत. ही प्रक्रिया सुव्यवस्थीपणे व पारदर्शक करण्यासाठी प्रशासनाने इमारतीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत.