टाटासुमो झाडावर धडकून सात गंभीर
By Admin | Updated: July 12, 2015 01:33 IST2015-07-12T01:33:29+5:302015-07-12T01:33:29+5:30
ग्राम पंचायतच्या निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्यासाठी आलेले गावी परतताना त्यांची टाटा सुमो झाडावर धडकली.

टाटासुमो झाडावर धडकून सात गंभीर
गोंदिया : ग्राम पंचायतच्या निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्यासाठी आलेले गावी परतताना त्यांची टाटा सुमो झाडावर धडकली. यात सात जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरूवारच्या रात्री ८.३० वाजता दरम्यान घडली. त्या जखमींना उपचारासाठी केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले.
ही घटना अंभोरा जवळ घडली. ते सर्व गोंदिया तालुक्यातील मोगर्रा येथील आहेत. जखमींमध्ये सरपंच शिशूपाल बाडूलाल उपवंशी, शिल्पा अमित वैद्य, खेलन मधू घोरमारे, हिरन छोटेलाल मेश्राम, भागरथा धरमू कुसराम, अनिल भाऊलाल नागपुरे व सुरेंद्र येरके यांचा समावेश आहे.सद्यस्थितीत अनिल, शिल्पा, भागरथा व सुरेंद्र रूग्णालयात उपचार घेत आहे. मोगर्रा येथील नऊ व्यक्ती एका सुमोने ग्राम पंचायतच्या निवडणुकीचे नामांकन पत्र भरण्यासाठी ते गोंदियाच्या तहसील कार्यालयात आले होते.परंतु काही कारणामुळे ते नामांकण पत्र भरू शकले नाही. ते घरी परतत असताना आंभोरा नजीक त्यांची टाटासुमो झाडावर धडकली.या घटनेची माहिती रावणवाडी पोलिसांना देण्यात आली.