शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

सात मुक्त तर सातची पडली भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2020 5:00 AM

बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे जिल्ह्यातील कोरोना क्रियाशील रुग्णांची संख्या आता २०५ वर पोहचली आहे. कोरोनावर मात केलेल्या रुग्णांमध्ये देवरी तालुक्यातील पुराडा येथील दोन रुग्ण आणि चिचगड येथील एक रुग्ण, गोंदिया शहरातील हनुमाननगर व सिव्हिल लाईन येथील प्रत्येकी एक रुग्ण आणि आमगाव तालुक्यातील घाटटेमनी आणि तिगाव येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

ठळक मुद्दे२५७ कोरोना बाधितांची कोरोनावर मात : ९९३९ स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची सातत्याने वाढ होत आहे. शुक्रवारी (दि.७) जिल्ह्यात पुन्हा सात कोरोना बाधितांची भर पडल्याने जिल्हावासीयांच्या चिंतेत भर पडली आहे. तर सात कोरोना बाधित कोरोनामुक्त झाल्याने जिल्हावासीयांना थोडा दिलासा सुध्दा मिळाला आहे.आतापर्यंत एकूण २५७ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत २०५ कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्ण आहे.तर आतापर्यंतच्या एकूण कोरोना बाधितांची संख्या ४९५ वर पोहचली आहे.शुक्रवारी आढळलेल्या सात बाधितांमध्ये गोंदिया तालुक्यातील एकोडी येथील दोन रुग्ण आणि शहरातील शास्त्री वॉर्डातील एक, सडक अर्जुनी येथील एक रुग्ण, आमगाव तालुक्यातील चिरचाळबांध येथील एक रुग्ण आणि तिरोडा तालुक्यातील बिरसी येथील दोन रुग्णांचा समावेश आहे.बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे जिल्ह्यातील कोरोना क्रियाशील रुग्णांची संख्या आता २०५ वर पोहचली आहे. कोरोनावर मात केलेल्या रुग्णांमध्ये देवरी तालुक्यातील पुराडा येथील दोन रुग्ण आणि चिचगड येथील एक रुग्ण, गोंदिया शहरातील हनुमाननगर व सिव्हिल लाईन येथील प्रत्येकी एक रुग्ण आणि आमगाव तालुक्यातील घाटटेमनी आणि तिगाव येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील २५७ रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे.कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत १० हजार ६१६ नमुने पाठविण्यात आले. यापैकी ४९५ स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले. तर ९९३९ स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. ८२ स्वॅब नमुन्यांच्या अहवाल प्रलंबित आहे. तर १४३ नमुन्यांचा अहवाल अनिश्चित आहे.गोंदियात आज आणि उद्या जनता कर्फ्यूशहरात सातत्याने वाढत चाललेली कोरोना रूग्णांची संख्या लक्षात घेत गोंदिया शहरात शनिवारी (दि.८) व रविवारी (दि.९) जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. या माध्यमातून कोरोनाची साखळी खंडीत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. शहरात मागील काही दिवसांपासून कोरोना रूग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. ही स्थिती लक्षात घेता शहरात समूह संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेत प्रशासनाने जनता कर्फ्यूचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत दवाखाने, औषध दुकाने, दुग्ध व दुग्धजन्य पदार्थांचा व्यवसाय तसेच वृत्तपत्रांचे वितरण सुरू साहील.वृत्तपत्रांचे वितरण राहणार सुरूगोंदिया नगर परिषदेने शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू घोषीत केला. यात अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले. शासनाने वृत्तपत्रांचा यापूर्वीच अत्यावश्यक सेवेत समावेश केला आहे. त्यामुळे जनता कर्फ्यूच्या कालावधीत शहरातील सर्वच भागात वृत्तपत्रांचे नियमित वितरण होणार आहे. वृत्तपत्र वाचकांच्या घरी सुरळीतपणे पोहचणार आहे. वाचकांनी याची नोंद घ्यावी.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या