शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
4
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
5
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
6
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
7
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
8
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
9
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
10
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
11
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
12
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
13
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
14
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
15
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
16
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
17
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
18
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
19
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
20
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

दुग्ध उत्पादन वाढीसाठी २१९ गावांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2020 06:00 IST

शेतकऱ्यांना शेती परवडत नसल्यामुळे शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध उत्पादनाकडे शेतकऱ्यांनी लक्ष द्यावे, जास्त दूध देणाऱ्या जनावरांची संख्या वाढावी, यातून देशी गार्इंवर कृत्रीम रेतन करून जास्त दूध देणाऱ्या जनावरांची निर्मिती करून त्यातून शेतकऱ्यांना आर्थिक समाधान मिळवून देण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला.

ठळक मुद्देदेशी गोवंशाला उच्च दर्जाचे कृत्रीम रेतन । प्रत्येक गावातील १०० जनावरे घेणार

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : देशी गोवंशाचा दर्जा वाढ करण्यासाठी जास्त दूध देणाऱ्या गोवंशाकडून कृत्रीम रेतन करून त्यांची दूध क्षमता वाढविण्यासाठी राज्य शासनाने एचवायआयव्ही या उपक्रमाची सुरूवात केली. या उपक्रमासाठी गोंदिया जिल्ह्यातील २१९ गावांची निवड करण्यात आली आहे. पहिल्या फेरीत १०० व दुसऱ्या फेरीत ११९ अशा एकूण २१९ गावांची निवड करण्यात आली आहे.जिल्ह्यातील देशी गार्इंना फळवून त्यातून जन्माला येणाऱ्या गाई अधिक दूध देतील व जिल्ह्यात दुग्ध उत्पादन वाढेल, या उद्देशातून उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यासाठी १५ सप्टेंबर २०१९ पासून पहिली फेरी सुरू करण्यात आली होती. तर दुसरी फेरी १ जानेवारी २०२० पासून सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य पशूसंवर्धन विभाग व जिल्हा परिषदेकडून वेळोवेळी वंधत्व निवारण व कृती शिबिराच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येते.शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करून वंधत्व निवारणाचे उपाय करून कृत्रीम रेतनाचे कार्य युद्धस्तरावर सुरू आहेत. हा कार्यक्रम सुरू झाल्यापासून आतापर्यंत दोन हजार २१७ जनावरांचे कृत्रीम रेतन करण्यात आले आहे. ३१ मार्चपर्यंत प्रत्येक गावातून गाई फळविण्याचे काम केले जात आहे.शेतकऱ्यांना शेती परवडत नसल्यामुळे शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध उत्पादनाकडे शेतकऱ्यांनी लक्ष द्यावे, जास्त दूध देणाऱ्या जनावरांची संख्या वाढावी, यातून देशी गार्इंवर कृत्रीम रेतन करून जास्त दूध देणाऱ्या जनावरांची निर्मिती करून त्यातून शेतकऱ्यांना आर्थिक समाधान मिळवून देण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला.गोंदिया जिल्ह्यात पहिल्या व दुसऱ्या अशा दोन टप्यात २१९ गावांची निवड करण्यात आली आहे.यात गोंदिया तालुक्यातील ७१ गावे, आमगाव तालुक्यातील २८ गावे, सालेकसा तालुक्यातील १५ गावे, देवरी तालुक्यातील ३१ गावे, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २० गावे, सडक-अर्जुनी तालुक्यातील १० गावे, गोरेगाव १९ गावे व तिरोडा तालुक्यातील २५ गावांचा समावेश आहे.२१ हजार ९०० जनावरांच्या कृत्रीम रेतनाचे उद्दिष्टदूग्ध उत्पादन वाढविण्यासाठी कृत्रीम रेतन करण्यासाठी निवड झालेल्या प्रत्येक गावातील १०० जनावरांचे कृत्रीम रेतन करण्याचे उद्दिष्ट आहे. गोंदिया जिल्ह्यातील २१ हजार ९०० गायी किंवा म्हशींचे कृत्रीम रेतन करायचे आहे. नियमित माजावर येणारी जनावरे व गोवंश उच्च जातीच्या विर्यकांड्याने कृत्रीम रेतनाद्वारे फळवून व माजावर न येणाऱ्या वंधत्व असलेल्या जनावरांचे उपचार करून त्यांनाही या प्रक्रियेत समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी पशू पालकांकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे.या योजनेपासून देशी गोवंश कालवडी या उच्च दुग्ध उत्पादन क्षमतेच्या राहणार आहेत. त्याचा निश्चित पशू पालकांना फायदा होणार आहे. शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांचे जास्तीतजास्त कृत्रीम रेतन करावे.-राजेश वासनिक,जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी, जि.प.गोंदिया.

टॅग्स :milkदूधcowगाय