सुरक्षा समितीने गावबंदीसाठी कसली कंबर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 05:00 AM2020-05-22T05:00:00+5:302020-05-22T05:00:35+5:30

जवळील ग्राम करांडली येथील एका व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने गावालगत असणाऱ्या बोेंडगाव (सुरबन), सुरबन, जरुघाटा, खोकरी, दिनकरनगर, केळवद, तुकुमनारायण या ७ गावांना प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून त्या गावांच्या सीमा बंद करुन पोलीस बंदोबस्त लावण्यात आले आहे.

The security committee has decided to close the village | सुरक्षा समितीने गावबंदीसाठी कसली कंबर

सुरक्षा समितीने गावबंदीसाठी कसली कंबर

Next
ठळक मुद्देमुख्यद्वार केले प्रवेशासाठी बंद : सुरक्षा समितीतील तरूणांचा कडक बंदोबस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
केशोरी : येथून ४ किमी. अंतरावरील ग्राम करांडली येथे एक व्यक्ती कोरोना बाधीत आढळल्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने करांडली जवळील बोंडगाव (सुरबन), सुरबन, जरुघाटा, खोकरी, दिनकरनगर, केळवद, तुकुमनारायण ही गावे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषीत केले आहे. त्या गावातील पूर्णपणे आवागमन बंद करुन पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शासनाच्या पावलावर पाऊल टाकत येथील कोरोना निवारण सुरक्षा समितीने त्वरीत बैठक बोलावून गावबंदीचा निर्णय घेऊन अंमलबजावणी सुद्धा करण्यात आली आहे.
जवळील ग्राम करांडली येथील एका व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने गावालगत असणाऱ्या बोेंडगाव (सुरबन), सुरबन, जरुघाटा, खोकरी, दिनकरनगर, केळवद, तुकुमनारायण या ७ गावांना प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून त्या गावांच्या सीमा बंद करुन पोलीस बंदोबस्त लावण्यात आले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत कोरोना निवारण सुरक्षा समितीने त्वरीत बैठक बोलावून स्वयंस्फूर्तीने गावबंदीचा निर्णय घेऊन २४ तास कोरोना निवारण सुरक्षा समितीच्या सदस्यांना आळीपाळीने पहारा देण्यात यावे असे ठरविण्यात आले. या परिसरातील केशोरी हे गाव बाजारपेठ असल्यामुळे दिवसभर इतर गावातील लोकांचे आवागमन असते. कोरोना विषाणूचा शिरकाव होण्याच्या भितीने सतर्कता म्हणून बाहेर गावातील व्यक्तींसाठी गावबंदी करुन बाहेरगावच्या व्यावसायीकांची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मूळनिवासी व्यावसायीकांनी आवश्यक वस्तूच्या विक्रीसाठी दुकाने सुरु ठेवण्याची वेळ सकाळी ८ ते दुपारी २ वाजतापर्यंत निश्चित करण्यात आली आहे. समितीच्या सदस्यांनी गावच्या चारही बाजूचे रस्ते लाकडे आडवी टाकून बंद केले आहेत. त्यावर पोलीस कर्मचाऱ्यांसारखे २४ तास कोरोना निवारण सुरक्षा समितीचे सदस्य पहारा देत आहेत. अतिआवश्यक कामाचे स्वरुप पाहून सवलत देण्याचा निर्णय समितीने घेतला असून बाहेर गावातील कोणत्याही व्यक्तीला गावबंदी करण्यात आली आहे. सदर बंदीतून शासकीय सेवेतील अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेले आॅन ड्युटी अधिकारी-कर्मचारी ओळखपत्राचे आधारे आवश्यक तातडीचे वैद्यकीय कारणे वैद्यकीय सेवेशी संबंधीत खाजगी डॉक्टर, नर्स, मेडिकल स्टोर्स, पॅथालॉजीस्ट, रुग्णवाहिका, जीवनावश्यक वस्तूच्या सेवा पुरवठा करणारे व्यक्ती, जीवनावश्यक वस्तूंशी संबंधित सेवांना सुट देण्यात आली असल्याचे समितीचे प्रमुख हिरालाल पाटील शेंडे आणि पोलीस पाटील नानाजी पेंदाम यांनी सांगीतले.

Web Title: The security committee has decided to close the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.