शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

शाळा ही व्यवसाय नसून माणूस घडविण्याचे साधन आहे

By admin | Updated: September 25, 2014 23:26 IST

सद्यस्थितीत शाळांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शाळांमधून सुजाण पिढी घडविण्याचे महानकार्य केले जाते. शाळा हा धंदा करण्यासाठी नाही. नैतिक मुल्ये, सुसंस्कार, रुजविण्याचे कार्य

गाणार : शिक्षण परिषदेचा तालुकास्तरीय मेळावाअर्जुनी/मोरगाव : सद्यस्थितीत शाळांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शाळांमधून सुजाण पिढी घडविण्याचे महानकार्य केले जाते. शाळा हा धंदा करण्यासाठी नाही. नैतिक मुल्ये, सुसंस्कार, रुजविण्याचे कार्य शाळांतून शिक्षक उत्तम प्रकारे पार पाडत आहेत. दुसरीकडे मोफत व सक्तीचे शिक्षण देणारे शासन शुल्क निर्धारणाबाबत सभागृहात चर्चा करीत आहे, असे प्रतिपादन आ.नागोराव गाणार यांनी केले.महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तालुका अर्जुनी/मोरगाव तर्फे स्थानिक पंचायत समिती बचत भवन येथे आयोजित शिक्षक मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडले. यावेळी अध्यक्षस्थानी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष उमेश कापगते तर विशेष अतिथी म्हणून आ.राजकुमार बडोले, डॉ.उल्हास फडके, राजाभाऊ तेलपांडे, सतिश मंत्री, लिलेश्वर बोरकर, गुणेश्वर फुंडे, तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आर.एस. कापगते, कैलाश कुरंजेकर, हेमंत राजगिरे, ओमप्रकाशसिंह पवार, एम.के. जांभुळकर, कृष्णा देशमुख आदि उपस्थित होते.गाणार पुढे म्हणाले, शैक्षणिक विकासोबतच शिक्षण व शिक्षकांचे हित जोपासणे माझे कर्तव्य आहे. ते मी जोपासणारच, प्रयत्न केल्याने वेतनेवर अनुदानाचा प्रश्न मार्गी लागला. शिक्षकांच्या वरिष्ठ वेतन श्रेणीतील ग्रेड वेतनाचा प्रश्न, अंशदायी पेंशन योजना ही राष्ट्रीय पेंशन योजनेत रुपांतरीत करण्याची समस्या, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन व वेतन सुरक्षा यासंबंधाने पाठपुरावा केल्यानंतरचा प्रश्न मार्गी लागला. शिक्षक आमदार निधीतून ज्या शाळांना काही शैक्षणिक साहित्य मिळाले नाही त्यांनी म.रा. शिक्षक परिषदेमार्फत मागणी केल्यास पुर्तता करण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओमप्रकाशसिंह पवार, संचालन के.डी. देशमुख यांनी केले. एम.के. जांभुळकर यांनी आभार मानले. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी रमेश मस्के, अशोक लंजे, राघोर्ते, जयप्रकाश करंजेकर, दुर्वास मस्के, शंभूनाथ मुरकुटे, बी.के. मस्के, बी.एस. जांभुळकर, विरेंद्र राणे, किशोर शंभरकर, भागवत बडोले, सोयाम, दिगंबर सोमवंशी, आर.के. बाळबुद्धे, गुलवास जांभुळकर, हिरालाल घोरमोडे व शिक्षकांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)