शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
5
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
6
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
7
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
8
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
9
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
10
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
11
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
12
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
13
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
14
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
15
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
16
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
17
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
18
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
19
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
20
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
Daily Top 2Weekly Top 5

गळा दाबून व दगडाने ठेचून सावलरामचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 06:00 IST

सावलरामचा गळा दाबून व दगडाने डोके ठेचून खून केल्यानंतर त्याची ओळख पटू नये म्हणून तोंडावर व छातीवर पेट्रोल टाकून आग लावली. टोयाटोला येथील दिलीप सराटे यांच्या शेतापासून सुमारे ३ किमी. अंतरावर असलेल्या चांदलमेटा जंगल परिसरात नकट्या तलावाच्या अलीकडच्या नालीत बांबूजवळ मृतदेह लपवून ठेवला होता.

ठळक मुद्देजादूटोण्याच्या संशयातून खून : पेट्रोल टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : देवरी तालुक्यातील ग्राम चांदलमेटा येथील सावलराम सोमाजी उईके (४९) यांचा मृतदेह मंगळवारी (दि.५) चांदलमेटा येथील जंगल परिसरातील नकटा तलाव परिसरातील एका नालीत बांबूच्या झाडाजवळ आढळला होता. जादूटोण्याचा संशयातून त्याला पाच जणांनी मारहाण गळा दाबून व दगडाने डोक्यावर मारुन खून केला असल्याचे आता उघडकीस आले आहे.सालेकसा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ग्राम चांदलमेटा येथील सावलराम सोमाजी उईके हे मंगळवारी (दि.५) ग्राम ओवारा येथील प्रौढ कबड्डी पाहण्यासाठी जातो म्हणून घरुन गेले होते. रात्री घरी न परतल्याने त्यांची पत्नी वंदना सावलराम उईके (४३) यांंनी ते बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांना दिली. मात्र जादूटोण्याच्या संशयावरुन सावलरामचा यांचा काटा काढण्यासाठी आरोपी जयकुमार उर्फ पप्पू पन्नालाल परतेती (२१), हितेश गणेश परतेती (१९), गणेश गणपत परतेती (४५), किशोर शामलाल परतेती (४०) व समीर शिवचरण वलके (२९) यांनी ओवारा ते चांदलमेटा रस्त्यावर रात्री ८.३० वाजता अंधाराचा फायदा घेत सावलरामचा पाठलाग केला. त्यांना पकडून दिलीप सराटे यांच्या धानात ओढत नेले व गळा दाबून त्याला खाली पाडले तसेच दगडाने डोक्यावर मारुन खून केला.या प्रकरणाची सर्व माहिती आरोपी हितेश परतेती व जयकुमार परतेती यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीत म्हटले आहे. यासंदर्भात मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे मृतदेहाचा ठिकाणी उत्तरीय तपासणी करण्यात आली आहे.पेट्रोल टाकून मृतदेह जाळलासावलरामचा गळा दाबून व दगडाने डोके ठेचून खून केल्यानंतर त्याची ओळख पटू नये म्हणून तोंडावर व छातीवर पेट्रोल टाकून आग लावली. टोयाटोला येथील दिलीप सराटे यांच्या शेतापासून सुमारे ३ किमी. अंतरावर असलेल्या चांदलमेटा जंगल परिसरात नकट्या तलावाच्या अलीकडच्या नालीत बांबूजवळ मृतदेह लपवून ठेवला होता. अशी माहिती स्वत: आरोपींनी दिली आहे.

टॅग्स :Murderखून