शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

३५५३ वाहनधारकांकडून वसूल केला पाच लाख रुपयांचा दंड

By admin | Updated: November 18, 2015 01:50 IST

दिवाळीच्या धामधुमीत वाहतुकीच्या नियमांना धाब्यावर बसवून अवैध प्रवासी वाहतूक, बेशिस्त पार्र्किंग यासह ...

दीड महिन्यातील कारवाई : वाहतूक नियमांची पायमल्लीगोंदिया : दिवाळीच्या धामधुमीत वाहतुकीच्या नियमांना धाब्यावर बसवून अवैध प्रवासी वाहतूक, बेशिस्त पार्र्किंग यासह विविध वाहतूक नियमांचे धिंडवडे काढणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी करडी नजर ठेवली होती. दिवाळीच्या एक महिना आधीपासून सुरू केलेल्या कारवाईत आतापर्यंत पाच लाखांच्या घरात दंड वसूल करण्यात आला.दिवाळीच्या एक महिना अगोदरपासून जिल्हाभरात वाहतुकीसंदर्भात कारवाई करण्याचे धाडसत्र वाहतूक नियंत्रक पोलिसांकडून राबविण्यात आले. गोंदिया जिल्हा वाहतुक पोलिसांनी आॅक्टोबर महिन्यात अवैध प्रवासी वाहतुक करणाऱ्या २१५ वाहनांवर कारवाई करून त्यांच्याकडून १ लाख ५३ हजार ६०० रूपये दंड वसूल केला आहे. या अवैध वाहतुकीत एक कार असून त्याच्याकडून २ हजार रूपये दंड वसूल केला आहे. १३ जीप चालकांकडून २५ हजार ४०० रूपये, ३ मेटॅडोर चालकांकडून ४ हजार रूपये, ६ ट्रॅक्टर चालकांकडून ६ हजार रूपये, १० ट्रॅव्हल्स चालकांकडून २१ हजार रूपये, ६५ टॅक्सी चालकांकडून ६५ हजार २०० रूपये, ११७ आॅटोरिक्षाकडून ३९ हजार रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच ३१४१ इतर वाहन चालकांकडून ३ लाख २१ हजार १०० रूपये वसूल करण्यात आले. आॅक्टोबर महिन्यात एकूण ३३५६ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून चार लाख ७४ हजार ७०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या १५ दिवसात गोंदियाच्या वाहतूक नियंत्रण शाखेने १९७ वाहनांवर कारवाई केली. त्यांच्याकडून १९ हजार ८०० रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. या पंधरवड्यात जिल्ह्यात वाहनांवर झालेल्या कारवाईची माहिती महिनाअखेर मिळणार असल्याने दिवाळीच्या सणातील पंधरवड्यात झालेली कारवाई आॅक्टोबर महिन्याच्या तुलनेत मोठी असल्याची चिन्हे दिसत आहेत. एकंदरीत दिड महिन्याच्या आत पाच लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी)वाहन चालकांना सिग्नलचे भान नाहीशहरातील वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी गोंदिया शहराच्या चौका-चौकात बसविण्यात आलेले सिग्नल पाहूनच वाहन चालकांनी आपले वाहन चालविणे आवश्यक आहे. परंतु अनेक वाहन चालक हे सिग्नल तोडून वाहने नेतात. त्यामुळे एकाच्या बरोबर इतरही वाहन चालक तोच प्रकार करतात. त्या ठिकाणी वाहतूक पोलीस कार्यरत असतो. मात्र जलद वाहने हाकणाऱ्या त्या व्यक्कीला पकडण्याचा प्रयत्न केला तर त्याचे संतुलन ढासळेल व अपघात होईल म्हणून त्याचा पाठलाग केला जात नाही.