शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

लैंगिक अत्याचार प्रकरणात प्रशासनाची भूमिका संशयास्पद

By admin | Updated: April 27, 2016 02:04 IST

तालुक्यातील फुक्कीमेटा जिल्हा परिषद शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनींवर लैगिंक अत्याचार प्रकरणात पोलिसांनी

शिक्षकावर कारवाईच नाही : दुसऱ्या आरोपीला अटक करण्यात पोलिसांना अपयशआमगाव : तालुक्यातील फुक्कीमेटा जिल्हा परिषद शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनींवर लैगिंक अत्याचार प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या शिक्षकावर जिल्हा परिषद प्रशासन मात्र चांगलेच मेहरबान दिसत आहे. घटनेला २५ दिवस लोटूनही त्या शिक्षकावव कारवाई केली नाही. त्यामुळे प्रशासनाची संशयास्पद भूमिका असल्याचे मत पालकांमध्ये उमटत आहेत. याशिवाय दुसऱ्या आरोपीला अद्यापही अटक करण्यात पोलिस विभागाला यश आले नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.आमगाव तालुक्यातील फुक्कीमेटा जिल्हा परिषद शाळा येथे शिक्षकांनी अल्पवयीन विद्यार्थिनींवर लैगिंक अत्याचार करण्याचे कृत्य केले. शिक्षणासारख्या पवित्र कार्यात शिक्षकांनीच केलेला हा विकृत मानसिकतेचा प्रकार सर्वांसाठी धक्कादायक ठरला. सुरूवातीला हा अत्याचार सहन करणाऱ्या विद्यार्थिनींनी अखेर शिक्षकांची वाढती मनोवृत्ती पाहता हा प्रकार पालकांना सांगितला. पालक व नागरिकांनी शाळेवर धाव घेऊन हे कृत्य उघड केले. संतापलेल्या नागरिक व पालकांनी अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला पोलिसांच्या स्वाधीन केले. गेल्या २ एप्रिलला शिक्षकाला अटक करण्यात आली. आरोपी शिक्षकाला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. याचदरम्यान दुसऱ्या प्रकरणाला वर्तमानपत्राच्या माध्यमाने वाचा फुटली. या प्रकरणात लैगिंक अत्याचार करणारा दुसरा आरोपी गजाआड झाला. परंतु गुन्हा नोंद होताच आरोपी शिक्षक पोलिसांच्या हातावर तुरी देत पसार झाला. अद्यापही त्या आरोपी शिक्षकाला अटक करण्यात पोलिसांना यश आले नाही. त्यामुळे नागरिक व पालकांमध्ये तीव्र नाराजी आहे.सदर प्रकरणातील अटक असलेल्या शिक्षकाला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. परंतु २५ दिवस लोटूनही जिल्हा परिषद प्रशासनाने त्या शिक्षकावर कोणतीच कारवाई केली नाही. उलट चौकशीच्या नावावर वेळ घालविण्यात येत असल्याने पालकांमध्ये व नागरिकांमध्ये जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या व प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. (शहर प्रतिनिधी)आरोपींना पाठबळ कुणाचे?मागील २५ दिवसांपुर्वी उघड झालेल्या विद्यार्थिनींच्या लैगिंक अत्याचार प्रकरणातील आरोपींवर योग्य कारवाई झाली नसतानाच तर दुसराही शिक्षक आरोपी पोलिसांना गवसला नाही. त्यामुळे या गंभीर प्रकरणात प्रशासनाच्या कर्तव्यावर प्रश्न निर्माण झाले आहे. या आरोपींना पाठबळ घालणारे कोण? अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे.