शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

गोंदियात ठिगळ लावून रस्त्यांची डागडुजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2017 01:08 IST

अवघ्या शहरातीलच रस्त्यांचे तीनतेरा वाजले आहेत. रस्त्यांच्या या अवस्थेमुळे शहरवासीय चांगलेच त्रस्त झाले आहेत.

बाजारातील रस्ते : थातूरमातूर कामावर पैशांचा अपव्यय गोंदिया : अवघ्या शहरातीलच रस्त्यांचे तीनतेरा वाजले आहेत. रस्त्यांच्या या अवस्थेमुळे शहरवासीय चांगलेच त्रस्त झाले आहेत. अशात मात्र बाजारातील रस्त्यांना ठिगळ लावून डागडूजी सुरू आहे. तेही काम थातूरमातूर होत असून काही दिवसांतच तेही उखडणार यात शंका नाही. अशात मात्र डागडुजीच्या नावावर पैशांचा अपव्यय नगर परिषदेकडून केला जात असल्याचे दिसून येत आहे. अवघ्या शहरालाच रस्त्यांचे ग्रहण लागले आहे. बाजार भाग असो की रहिवासी भाग, संपूर्ण शहरातीलच रस्ते उखडलेले असून त्यावरून चालणे कठीण झाले आहे. शहरातील रस्त्यांच्या या अवस्थेमुळे लागणाऱ्या दचक्यांनी शहरवासीयांची ‘हड्डी-पसली’ एक झाली असल्याचेही बोलले जात आहे. मात्र रस्त्यांच्या या समस्येवर तोडगा काही दिसून येत नाही. अशात सध्या बाजार भागातील रस्त्यांच्या डागडुजीचे काम केले जात आहे. येथे डागडुजी म्हणून रस्त्यांवरील खड्ड्यांवर ठिगळ लावले जात आहे. खड्ड्यांवर डांबरी मसाला टाकला जात असून त्यावर रोलरही फिरविलेला नसल्याचे दिसून येत आहे. नेहरू चौक ते दुर्गा चौक व गांधी प्रतिमा ते श्री टॉकीज चौक मार्गावर हे काम सुरू आहे. विशेष म्हणजे बाजारातील नागरिकांनी नगराध्यक्षांकडे रस्त्यांची समस्या मांडली त्यावर नगराध्यक्षांनी हे रस्ता दुरूस्तीचे काम करण्याचे आदेश दिल्याची माहिती आहे.एकीकडे रस्त्यांच्या विषयाला घेऊन स्थायी तोडगा काढला जात नाही. त्यात दुरूस्तीच्या नावावर फक्त ठिगळ लावले जात असून तेही थातूरमातूर काम सुरू असल्याचे दिसून येते. त्यामुळे हे ठिगळ काही जास्त दिवस टिकणार नाही हे स्पष्टपणे दिसत आहे. अशात या कामावर खर्च केलेला पैसा वाया तर जाणार नाही ना, अशी स्थिथी आहे. (शहर प्रतिनिधी)सिमेंट रस्त्याचे दिवास्वप्नयाबाबत नगर परिषद मुख्याधिकारी चंदन पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात हे काम केले जात आहे. बाजारातील या रस्त्यांसाठी सिमेंट रस्ता प्रस्तावीत आहे. मात्र त्यापूर्वी बाजारातील नागरिकांची सोय व्हावी या उद्देशातून हे काम केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. मार्केट परिसरात सिमेंट रस्ते तयार करण्यापूर्वी अंडरग्राऊंड ड्रेनेजचे काम करावे लागणार आहे. त्यामुळे हे काम एवढ्यात होणे शक्य नाही. शहरातील आणखीही रस्ते याहीपेक्षा जास्त खराब झाले आहेत. त्यांचीही अशाचप्रकारे डागडुजी करण्याचीही मागणी होत आहे.