शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

सडक-अर्जुनी व गोरेगाव तालुका कोरोनामुक्तीच्या वाटेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 05:00 IST

अवघ्या देशाची गाडी रुळांवर आली असताना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला. सर्व काही अस्तव्यस्त करून दुसरी लाट आता ओसरताना दिसत आहे. जिल्ह्यातही आता ती ओसरताना दिसत असून बाधितांची संख्या चांगलीच नियंत्रणात आली आहे. त्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त असल्याने क्रियाशील रुग्णांची संख्या चांगलीच घटत चालली आहे. सुदैवाने दररोजच्या बाधितांची संख्या कमी व रुग्ण बरे होण्याची संख्या जास्त असल्याने आता जिल्ह्यात परिस्थिती नियंत्रणात आली आहे. 

ठळक मुद्देनाममात्र क्रियाशील रुग्ण : कोरोना नियमांचे पालन करून नागरिकांच्या सहकार्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दुसऱ्या लाटेने कहर केल्यानंतर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत मोठ्या प्रमाणात बाधितांची संख्या वाढली होती. यामुळेच जिल्ह्यातील बाधितांची संख्या ४१ हजारांच्या घरात गेली आहे. मात्र, आता दुसरी लाट ओसरत असून बाधितांची संख्या चांगलीच घटली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्यामुळे सडक-अर्जुनी व गोरेगाव तालुका आता कोरोनामुक्तीच्या वाटेवर दिसत आहे. यातील सडक-अर्जुनी तालुक्यात शनिवारी फक्त ४, तर गोरेगाव तालुक्यात ५ क्रियाशील रुग्ण उरले होते. अवघ्या देशाची गाडी रुळांवर आली असताना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला. सर्व काही अस्तव्यस्त करून दुसरी लाट आता ओसरताना दिसत आहे. जिल्ह्यातही आता ती ओसरताना दिसत असून बाधितांची संख्या चांगलीच नियंत्रणात आली आहे. त्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त असल्याने क्रियाशील रुग्णांची संख्या चांगलीच घटत चालली आहे. सुदैवाने दररोजच्या बाधितांची संख्या कमी व रुग्ण बरे होण्याची संख्या जास्त असल्याने आता जिल्ह्यात परिस्थिती नियंत्रणात आली आहे.  सुखद बाब म्हणजे, यातच आता सडक-अर्जुनी व गोरेगाव तालुका कोरोनामुक्तीच्या वाटेवर दिसून येत आहे. शनिवारी सडक-अर्जुनी तालुक्यात ४, तर गोरेगाव तालुक्यात ५ क्रियाशील रुग्ण होते. अशात येत्या दिवसांत हे दोन तालुके कोरोनामुक्त होणार यात शंका नाही. याशिवाय, अन्य तालुक्यांतही क्रियाशील रुग्णांची संख्या चांगलीच कमी झाली असून कोरोना असाच नियंत्रणास असल्यास तेही कोरोनामुक्त होणार आहे. 

सर्वाधिक रुग्ण गोंदिया तालुक्यात - जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला तेव्हापासूनच गोंदिया तालुका हॉटस्पॉट ठरला आहे. सर्वाधिक बाधित व मृतांची संख्या गोंदिया तालुक्यातच सर्वाधिक आहे. हीच परिस्थिती आजही कायम असून गोंदिया तालुक्यात सर्वाधिक ९१ क्रियाशील रुग्ण आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आमगाव तालुका असून तेथे ३० क्रियाशील रुग्ण आहेत. विशेष म्हणजे, कधी दुसरा हॉटस्पॉट असलेला तिरोडा आता नियंत्रणात असल्याने तेथे क्रियाशील रुग्णांची संख्या कमी झाल्याचे दिसत आहे. 

प्रत्येकाने लस घेण्याची गरज कोरोनाला पुढे आपले पाय पसरू द्यायचे नसल्यास सर्वांचे लसीकरण करण्याची गरज आहे, असे शास्त्रज्ञ सांगत आहेत. यामुळेच जिल्ह्यात लसीकरणासाठी मोहीम उघडण्यात आली असून गावागावांत लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. शिवाय, शिबिर घेऊन लसीकरण केले जात आहे. अशात आता नागरिकांनी लस घेऊन स्वत:सह आपल्या कुटुंबीयांना सुरक्षित करण्याची गरज आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या