शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
13
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
14
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
15
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
16
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
17
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची वाढतेय तूट अन शेतकरी चिंतातूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 05:00 IST

जिल्ह्यात १ जून ते ३० सप्टेंबर दरम्यान सरासरी १३२७ मीमी पाऊस पडतो.यंदा हवामान विभागाने सुध्दा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र यावर्षी सुरूवातीपासून पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यात अद्यापही पावसाने सरासरी गाठलेली नाही.

ठळक मुद्देरोवण्या खोळंबल्या : दोन महिन्यात २२७ मीमी सरासरी पावसाची तूट

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : यंदा जिल्ह्यात सुरुवातीपासूनच पावसाने ओढ दिल्याने पावसाची तूट वाढत आहे. १ जून ते २० जुलैपर्यंत पडणाऱ्या सरासरी पावसावर नजर टाकली असता २२७.१५ मीमी पावसाची तूट निर्माण झाली आहे. जून, जुलै हे दोन महिने पावसाचे समजले जातात. मात्र याच महिन्यात सरासरीपेक्षा पाऊस कमी पडल्याने रोवणीची कामे पूर्णपणे खोळंबली असून शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.जिल्ह्यात १ जून ते ३० सप्टेंबर दरम्यान सरासरी १३२७ मीमी पाऊस पडतो.यंदा हवामान विभागाने सुध्दा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र यावर्षी सुरूवातीपासून पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यात अद्यापही पावसाने सरासरी गाठलेली नाही. दमदार पाऊस झाला नसल्याने रोवणीची कामे सुध्दा पूर्णपणे खोळंबली आहेत. आतापर्यंत केवळ २५ टक्के रोवणी झाली असून ७५ टक्के रोवण्या शिल्लक आहे. जिल्ह्यात पाऊस अधून मधून हजेरी लावत असला तरी दमदार पाऊस होत नसल्याने शेतीच्या कामावर सुध्दा परिणाम झाला आहे.एकंदरीत पावसाची तूट वाढत चालल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण कमी होते त्यातच आताच पावसाची तूट सरासरी २२७.१५ मीमीवर पोहचली आहे. त्यामुळे आठ दहा दिवसात पाणी पाऊस न झाल्यास पावसाची तूट वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.दरम्यान यंदा पावसाने ओढ दिल्याने धानाच्या उत्पादनावर सुध्दा याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्ह्यात यंदा खरिपात १ लाख ८९ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात येणार आहे. मात्र आतापर्यंत केवळ ४४ हजार हेक्टरवर रोवणीची कामे पूर्ण झाली असून १ लाख ४९ हजार हेक्टरवरील रोवण्या शिल्लक आहेत.

टॅग्स :agricultureशेती