शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील तांदळाचे गोदाम झाले हाऊसफुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 06:00 IST

जिल्हा मार्केटिंग फेडरेश आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत यंदा आत्तापर्यंत एकूण २७ लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे.यापैकी १४ लाख क्विंटल धानाची भरडाई झाली आहे. तर १३ लाख क्विंटल धानाची भरडाई करण्याचे आदेश राईस मिलर्सना द्यायचे आहे. मात्र आधीच भरडाई केलेल्या १४ लाख क्विंटल धानाची भरडाई करुन तयार झालेला तांदूळ ठेवण्याची समस्या निर्माण झाली आहे. परिणामी धानाच्या भरडाईचे आदेश द्यायचे कसे अशी समस्या या दोन्ही विभागांपुढे निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देनवीन तांदूळ ठेवण्याची समस्या : विक्रमी खरेदीने नियोजन फसले, तांदळाची उचल करण्याच्या आदेशाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत हमीभावानुसार धान खरेदी केली जाते. यानंतर खरेदी केलेल्या धानाची राईस मिलर्सशी करार करुन भरडाई केली जाते. भरडाई केलेला तांदूळ शासनाकडे जमा केला जातो. मात्र गोदामात पडून असलेल्या ६० हजार मेट्रीक टन तांदळाची उचल अद्यापही करण्यात आली नाही. परिणामी यंदा भरडाई केलेला हजारो क्विंटल तांदूळ ठेवायचा कुठे असा बिकट प्रश्न जिल्हा पुरवठा विभागासमोर निर्माण झाला आहे.जिल्हा मार्केटिंग फेडरेश आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत यंदा आत्तापर्यंत एकूण २७ लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे.यापैकी १४ लाख क्विंटल धानाची भरडाई झाली आहे. तर १३ लाख क्विंटल धानाची भरडाई करण्याचे आदेश राईस मिलर्सना द्यायचे आहे. मात्र आधीच भरडाई केलेल्या १४ लाख क्विंटल धानाची भरडाई करुन तयार झालेला तांदूळ ठेवण्याची समस्या निर्माण झाली आहे. परिणामी धानाच्या भरडाईचे आदेश द्यायचे कसे अशी समस्या या दोन्ही विभागांपुढे निर्माण झाली आहे. कृषी विभागाने मागील खरीप हंगामात धानाचे विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त केला होता. तो अंदाज यंदा पूर्णपणे खरा ठरला. मागील वर्षी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने खरीप हंगामात एकूण १८ लाख क्विंटल धान खरेदी केली होती. तर यंदा ५ फेब्रुवारीपर्यंत १९ लाख ५० हजार क्विंटल धान खरेदी केली आहे.त्यामुळे मागील वर्षीपेक्षा आतापर्यंत दीड लाख क्विंटल खरेदी अधिक झाली आहे. तर खरीप हंगामातील खरेदी मार्चपर्यंत चालते. त्यामुळे पुन्हा आठ ते दहा लाख क्विंटल धान खरेदी होण्याचा अंदाज जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने वर्तविला आहे. तर आदिवासी विकास महामंडळाने आत्तापर्यंत ७ लाख ५८ हजार क्विंटल धान खरेदी केली आहे.शासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात आलेल्या एकूण २७ लाख क्विंटल धानापैकी आत्तापर्यंत १४ लाख क्विंटल धानाची भरडाई करण्यात आली आहे.मात्र अद्यापही १३ लाख क्विंटल धान भरडाईच्या प्रतीक्षेत धान खरेदी केंद्रावर पडून आहे. तर दुसरीकडे खरेदी केंद्रावर धानाची आवक मोठ्या प्रमाणात आहे. मात्र गोदाम हाऊस फुल असल्याने भरडाईसाठी धानाची उचल करण्याचे आदेश देण्याची अडचण निर्माण झाली आहे. परिणामी दोन्ही विभागाच्या केंद्राबाहेर खरेदी केलेला धान उघड्यावर तसाच पडून आहे.गोदामांची क्षमता ६० हजार मेट्रीक टनचीजिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत खरेदी केलेल्या धानाची राईस मिलर्सशी करार करुन त्याची भरडाई केली जाते. भ्राईस मिलर्स धानाची भरडाई करुन नियमानुसार तांदूळ शासनाकडे जमा करतात. त्यानंतर केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशानुसार गोदामातील तांदळाची उचल करुन तो विविध जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांना पुरवठा केला जातो. तांदूळ ठेवण्यासाठी गोंदिया येथे ६० हजार मेट्रीक टन क्षमतेचे गोदाम आहेत. मात्र अद्यापही गोदामातील तांदळाची उचल करण्याचे आदेश प्राप्त न झाल्याने नवीन तांदूळ ठेवण्याची समस्या निर्माण झाली आहे.गोदामातील तांदळाची उचल करण्याचे आदेश अद्याप शासनाकडून मिळालेले नाही. येत्या दोन तीन दिवसात आदेश प्राप्त होण्याची शक्यता आहे. आदेश प्राप्त होताच गोदाम रिकामे झाल्यानंतर भरडाई केलेला तांदूळ त्यात ठेवण्यात येईल.- डी.एस.वानखेडे, जिल्हा पुरवठा अधिकारी गोंदिया.