शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
5
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
6
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
7
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
8
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
9
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
10
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
11
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
12
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
13
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
14
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
15
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
16
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
17
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
18
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
19
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
20
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणामुळे दिग्गजांना झटका

By admin | Updated: May 8, 2015 00:58 IST

आमदार-खासदाराची जागा एसटी राखीव झाल्याने लायकी असूनही आमदार किंवा खासदारपदाचे दार बंद असल्याने अनेकांचा हिरमोड आधीच झाला आहे.

विजय मानकर सालेकसाआमदार-खासदाराची जागा एसटी राखीव झाल्याने लायकी असूनही आमदार किंवा खासदारपदाचे दार बंद असल्याने अनेकांचा हिरमोड आधीच झाला आहे. आता कमीत कमी जि.प. सदस्य बनून पदाधिकारी बनावे, अशी इच्छा बाळगणारे सालेकसा तालुक्यातील दिग्गज राजकारणी सध्या जि.प.च्या दोन जागा एसटी राखीव झाल्याने अडचणीत आले आहेत. त्यांचे जि.प. सदस्य बनण्याचेही स्वप्न भंग झाले आहे. सालेकसा तालुक्यात गैरआदिवासी लोकांची संख्या ९५ टक्क्यांच्या वर असून सर्व साधारणसाठी खुल्या असलेल्या जागा रद्द करुन अनुसूचित जमातीसाठी राखीव का करण्यात आले, म्हणून अनेक भावी उमेदवार आक्षेप घेण्याच्या पवित्र्यात आले आहेत.गोंदिया जिल्हा परिषदेत एकूण ५३ सदस्यांपैकी सालेकसा तालुक्याच्या वाट्याला एकून चार जि.प. सदस्य संख्या लाभली आहे. यात झालिया, पिपरीया, आमगाव खुर्द आणि कारुटोला क्षेत्राचा समावेश आहे. या पुर्वी काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीत झालिया पिपरीया आणि आमगाव खुर्द हे तिन्ही क्षेत्र सर्वसाधारण उमेदवारासाठी खुले झाले होते. तर कारुटोला क्षेत्राची जागा सर्वसाधारण महिलासाठी खुली होती. मात्र आता पुन्हा आरक्षण जाहिर झाले. झालिया आणि आमगाव खुर्दची जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्याने भाजपचे तालुका अध्यक्ष खेमराज लिल्हारे आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कटरे यांच्यासह अनेक दिग्गज अडचनित आले आहेत. त्यांचे स्वप्न भंग होताना दिसत आहेत. हे दोन्ही क्षेत्र एसटी आणि राखीव झाल्याने एकीकडे दिग्गज अडचणीत आले आहेत तर दुसरीकडे एसटीसाठी योग्य उमेदवाराचा तोटा प्रत्येक पक्षात दिसत आहे. पिपरीया क्षेत्र एसटी बाहूल क्षेत्र असून सर्वसाधारण झाल्याने येथे उमेदवारिसाठी चुरस वाढलेली दिसत आहे. कारुटोला क्षेत्र ओबीसी महिला साठी राखीव झाली असून येथेही उमेदवारीसाठी चुरस वाढली आहे. झालिया जि.प. क्षेत्रासाठी भाजपचे तालुका अध्यक्ष खेमराज लिल्हारे, जेष्ठ कार्यकर्ते व माजी जि.प. सदस्य मेहतर दमाहे, जिल्हा महिला महामंत्री प्रतिभा परिहार हे प्रबळ दावेदार असून हेमराज सुलाखे, अरुण टेंभरे सुद्धा भाजपच्या उमेदवारीसाइी रांगेत होते.काँग्रेस पक्षाकडून गजानन मोहारे, विद्यमान पं.स. सदस्य कैलाश अग्रवाल, घनश्याम नागपुरे प्रमुख उमेदवार होते. तर राष्ट्रवादी काँग्रेस कडून विद्यमान जि.प. सदस्या देवकी नागपूरे यांचे पती व तालुका अध्यक्ष लक्ष्मण नागपूरे प्रमुख दावेदार होते. परंतु या सगळ्यांचा स्वप्नभंग झाला आहे. आमगाव खुर्द जि.प. क्षेत्रातून भाजपच्यावतीने विद्यमान जि.प. सदस्य कल्याणी कटरे यांचे पती व भाजपचे जिल्हा सचिव योगेश कटरे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गुणवंत बिसेन, माजी युवा मोर्चाध्यक्ष अजय वशिष्ठ,महामंत्री उमेदलाप जैतवार उमेदवारीच्या रांगेत होते. काँग्रेस पक्षाकडून जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कटरे, प्रबळ दोवेदार होते. त्याच बरोबर इतर प्रमुख पदाधिकारी उमेदवारीच्या प्रयत्नात होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा महासचिव बबलू कटरे, माजी महिला जिल्हा अध्यक्ष दुर्गा तिराले व इतर पदाधिकारी दावेदार होते. त्यामुळे वैचारीक उमेदवारीसाठी आपापली तलवार काढून ताव मारीत होते. परंतु दोन्ही जागा एसटी साठी राखीव झाल्याने आता या सर्वांचे स्वप्न भंग झाले असून या सर्वांचे स्वप्न भंग झाले असून या सर्वांनी आपआपल्या राजकीय तलवारी म्यान केल्या आहेत. झालिया क्षेत्रात लोधी समाजासह इतर ओबीसी प्रवर्गाचे लोग मोठ्या प्रमाणावर आहेत. तसेच आमगाव खुर्द क्षेतात लोधी पोवार कुणबीटोला व इतर ओबीसी सह कला प्रवर्गाचे हे लोक राहतात. दोन्ही क्षेत्रात अनुसूचित जमातीचे लोक अत्यल्प प्रमाणात असून राजकारणाचे त्याचे स्थान गौण आहे. त्यामुळे सर्वच पक्षाना टेंभा घेवून एसटी उमेदवार शोधावे लागणार एवढे नक्की. तर दिग्गज नेत्यांना पडद्यामागचेच राजकारण करावे लागणार आहे.