शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

संयुक्त रिपब्लिकन संघटनेचे तहसीलदारांना निवेदन

By admin | Updated: November 6, 2014 22:58 IST

अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडे येथील दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ संयुक्त रिपब्लिकन संघटना तिरोड्याच्या वतीने तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना सोमवारी ३ नोव्हेंबर रोजी निवेदन देण्यात आले.

तिरोडा : अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडे येथील दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ संयुक्त रिपब्लिकन संघटना तिरोड्याच्या वतीने तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना सोमवारी ३ नोव्हेंबर रोजी निवेदन देण्यात आले. जवखेडे येथील जाधव कुटुंबातील मुलगा, आई व वडील यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्याकांडामुळे दलित समाजामध्ये तीव्र असंतोष पसरलेला आहे. ही घटना मानवतेला कलंकित करणारी असून अशोभनीय, लाजीरवाणी व दु:खद घटना आहे. हत्याकांडातील आरोपींना त्वरीत अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, यासाठी संयुक्त रिपब्लीकन संघटना तिरोड्याच्या वतीने तहसील कार्यालय परिसरात तीव्र निषेध व्यक्त करून तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाठविण्यात आले.निवेदन देतेवेळी संयुक्त रिपब्लिकन संघटनेचे अध्यक्ष तिर्थराज बागडे, सचिव के.के. वैद्य, उपाध्यक्ष महेंद्र बडगे, संघटक गुणवंतराव बंसोड, विरेंद्र बागडे, हरिचंद्र सूर्यवंशी, चित्तरंजन मेश्राम, सत्यवान मेश्राम, राजकुमार रोडगे, राजेंद्र रामटेके, रोशन रामटेके, राजेश रामटेके, दानीयाल बंसोड, तारेंद्र गेडाम, अविनाश बंसोड, संगम उईके, प्रल्हाद वैद्य उपस्थित होते.गोंदिया : अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडे (पाथर्डी) येथील तिहेरी हत्याकांड जातीय मानसिकतेचे रौद्र रूप असल्यामुळे जिल्हा राष्ट्रवादी दलित आघाडीचे अध्यक्ष मनोहर वालदे यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला. श्रीनगर येथील जनसंपर्क भेटीत या प्रकरणावर असंतोष व्यक्त केला. गेल्या २० आॅक्टोबरला दलित कुटुंबातील संजय जाधव, पत्नी जयश्री व मुलगा सुनील यांची झोपेत क्रूर हत्या करण्यात आली. या हत्याकांडामुळे दलित समाजात उद्रेकाची भावना पसरली आहे. आरोपींना त्वरीत अटक करा, अशा मागणीचे निवेदन वरिष्ठांना पाठविण्यात आले असून निवेदनात महेंद्र नारनवरे, दिगंबर मेश्राम, चुनीलाल धमगाये, गंगाधर भोयर, शालीक गंगाभोज, सुकराम बावणकर, देवेंद्र जांभुळकर, ललीत साखरे, राजू बागडे, येशूराम बडोले, आकाश टेंभुर्णे, महेंद्र टेंभेकर आदींनी याप्रकरणी तातडीने आरोपींना अटकेची मागणी केली आहे.