शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

गोरेगावच्या नायरा हॉस्पिटलची नोंदणी रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:28 IST

गोंदिया : विनापरवानगीने कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या गोरेगाव येथील नायरा मल्टिस्पेशॉलिटी हॉस्पिटलची मान्यता रद्द करण्याचे आदेश जिल्हा शल्य ...

गोंदिया : विनापरवानगीने कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या गोरेगाव येथील नायरा मल्टिस्पेशॉलिटी हॉस्पिटलची मान्यता रद्द करण्याचे आदेश जिल्हा शल्य चिकत्सक अमरीश मोहबे यांनी १५ मे रोजी काढले आहेत.

कोरोना रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी नसताना नायरा हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार केले जात होते. याची माहिती स्थानिक प्रशासनाला दिली नव्हती. कोरोना रुग्णांना सेवा देण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य उघड्यावर टाकण्यात आले. या प्रकरणाची तक्रार स्थानिक प्रशासनाकडे केल्याने उपविभागीय अधिकारी, गोरेगावचे ठाणेदार, तहसीलदार यांनी १९ एप्रिल रोजी या हॉस्पिटलला भेट दिली. तेव्हा हॉस्पिटलमध्ये १४ कोरोना रुग्ण उपचार घेत असल्याचे लक्षात आले. याची माहिती डॉ. लक्ष्मीकांत वाघमारे यांनी स्थानिक प्रशासनास न देता रुग्णांचा जीव धोक्यात घालून उपचार केले. या हॉस्पिटलमधील जैविक कचऱ्याची विल्हेवाटदेखील विहित पद्धतीने न लावता हॉस्पिटलच्या परिसरात इतरत्र फेकण्यात आल्याने स्थानिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला. या हॉस्पिटलवर प्रशासनाने दंड आकारला होता, परंतु डॉ. लक्ष्मीकांत वाघमारे यांनी तो दंडही भरला नाही. त्यामुळे गोरेगावच्या नगरपंचायतमधील प्रशासकीय अधिकारी आशुतोष रंगराव कांबळे यांच्या तक्रारीवरून गोरेगाव पोलिसांनी भादंविच्या कलम १८८,२६९,२७० सहकलम ५१ (ब) आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ सहकलम २,३,४ साथीचे रोग अधिनियम १८९७ अन्वये गुन्हा नोंद केला. यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक यांनी १५ मे रोजी पत्र काढून नायरा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलची मान्यता रद्द केली आहे.