आरटीपीसीआर चाचण्या कमी करणे भोवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 05:00 AM2020-10-17T05:00:00+5:302020-10-17T05:00:39+5:30

कोरोनाचा वाढता संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागातर्फे माझी कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबविली जात आहे. तसेच चाचण्याचे प्रमाण आणि कॉन्टॅक्ट ट्रेसींग करुन उपचार करण्यावर भर दिला जात आहे. कोरोनाचा चढता ग्राफ खाली आणून जिल्हा कोरोनामुक्त करणे हा मागील हेतू आहे. पण आरोग्य विभागातील काही अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याची बाब जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्याम निमगडे आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरिश मोहबे यांच्या निदर्शनात आली.

Reduced RTPCR tests | आरटीपीसीआर चाचण्या कमी करणे भोवले

आरटीपीसीआर चाचण्या कमी करणे भोवले

Next
ठळक मुद्देवैद्यकीय अधीक्षकांना कारणे दाखवा : चाचण्या वाढविण्यावर भर द्या

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील नवेगावबांध, गोरेगाव, सालेकसा या ग्रामीण रुग्णालयात मागील आठ दहा दिवसात आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण कमी केले होते. मात्र यामुळे कोरोनाचा संसर्ग अधिक वाढण्याची शक्यता नाकाराता येत ही गंभीर बाब हेरून जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सकांनी तीन वैद्यकीय अधीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे. तसेच चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याचे निर्देश दिले आहे.
कोरोनाचा वाढता संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागातर्फे माझी कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबविली जात आहे. तसेच चाचण्याचे प्रमाण आणि कॉन्टॅक्ट ट्रेसींग करुन उपचार करण्यावर भर दिला जात आहे. कोरोनाचा चढता ग्राफ खाली आणून जिल्हा कोरोनामुक्त करणे हा मागील हेतू आहे. पण आरोग्य विभागातील काही अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याची बाब जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्याम निमगडे आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरिश मोहबे यांच्या निदर्शनात आली. नवेगावबांध, गोरेगाव, सालेकसा या ग्रामीण रुग्णालयात मागील काही दिवसात आरटीपीआर टेस्ट करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे ही बाब गंभीर असून यामुळे एकाचवेळी कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या काही ग्रामीण रुग्णालयात केवळ ५ ते ७ आरटीपीसीआर टेस्ट केल्या जात आहे. हे प्रमाण फारच कमी असून याकडे काही वैद्यकीय अधिकारी दुर्लक्ष करीत आहे. मात्र यापुढे यात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. तसेच चाचण्याचे प्रमाण कमी असल्याप्रकरणी नवेगावबांध, सालेकसा, गोरेगाव या तीन ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून आठ दिवसात यावर उत्तर मागविले आहे. तसेच इतर वैद्यकीय अधीक्षकांना आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याच्या सूचना केल्या आहे.

त्रिसूत्रीचा अवलंब करा
कोरोनाचा संसर्ग आटोक्यात हे एकमेव उद्दिष्ट समोर ठेवून सर्व ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी लक्ष द्यावे. तसेच कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व टेस्टिंग आणि उपचार या त्रिसूत्रीचा अवलंब करुन उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहे.

इतर आजाराच्या रुग्णांकडे लक्ष द्या
कोरोना संक्रमण काळात इतर आजाराच्या रुग्णांच्या संख्येत सुध्दा वाढ होत आहे. त्यामुळे याकडे लक्ष देऊन गर्भवती महिला, मधूमेह रुग्ण, ह्दयरुग्ण, उच्च रक्तदाब आदी रुग्णांचे देखील कोविड टेस्टींग करावी. ग्रामीण रुग्णालयात बाह्यरुग्ण तपासणी विभागात येणाऱ्या रुग्णांकडे सुध्दा लक्ष देण्याचे निर्देश दिले आहे.

Web Title: Reduced RTPCR tests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.