शहरं
Join us  
Trending Stories
1
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
2
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
3
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
4
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
5
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
6
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
7
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
8
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
9
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
10
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
11
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
12
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
13
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
14
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
15
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
16
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
17
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

मालीजुंगा येथे रानडुकराची शिकार

By admin | Updated: September 18, 2014 23:37 IST

सडक/अर्जुनी तालुक्यातील पांढरी परिसरातील मालीजुंगा येथील निवासी सुरेश गणाजी कापगते (५०) यांच्या शेतशिवारामध्ये जंगली रानडुकराची शिकार करण्यात आली.

पांढरी : सडक/अर्जुनी तालुक्यातील पांढरी परिसरातील मालीजुंगा येथील निवासी सुरेश गणाजी कापगते (५०) यांच्या शेतशिवारामध्ये जंगली रानडुकराची शिकार करण्यात आली. गट नं. ८६/२/२, पटवारी हलका नंबर ११,०.८१ आराजी यांच्या मालकीची जमीन असून वनविभागाचे कर्मचारी गस्त घालत असताना त्यांना काही संशयास्पद आवाज ऐकून आला. त्यावर वनविभागाचे कर्मचारी आवाजाच्या दिशेने समोर जाऊ लागले. त्यांना काही व्यक्ती जमिनीमध्ये काही कापताना आढळले. वनविभागाच्या कर्मचारी वर्गाने जवळ जाऊन बघितले असता शिकारी तेथून पसार झाले. चौकशी केली असता त्या ठिकाणी रानडुकराचे तीन मोठे तुकडे केलेले दिसले. यावरून शिकारी मांस विक्रीला नेण्याच्या तयारीत होते, असा अंदाज वर्तविला जात आहे. घटनास्थळी २ कुऱ्हाड, २ सायकली, तारेचे कुंपन व लाकडी दांडके आदी सामग्री मिळाली. त्यांना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी जप्त केले.चौकशीकरिता वनपरिक्षेत्र अधिकारी सडक/अर्जुनी जी.एस. राठोड यांना पाठविण्यात आले होते. यामध्ये २ रानडुक्कर मारण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यापैकी एक डुक्कर कुजलेल्या अवस्थेमध्ये तर दुसरा डुक्कर चांगल्या अवस्थेमध्ये तिथे आढळला. कृष्णकुमार बोपचे पो.पा. रेंगेपार, सरयुकुमार बिसेन, चुडामन पुस्तोडे यांना साक्षीदार म्हणून ठेवण्यात आले होते. पशुवैद्यकीय अधिकारी बबनराव कांबळे यांनी शवविच्छेदन केले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पीओआर जमिन मालकाच्या नावे फाडून वरील चौकशी अधिकारी जे.जी. खोब्रागडे व वनरक्षक कु.पी.के. नंदागवळी करीत आहेत. (वार्ताहर)