शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे व बसगाड्या हाऊसफुल्ल

By admin | Updated: November 13, 2015 01:46 IST

दिवाळी म्हटले की सुट्या. प्रत्येक घरातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या दिवाळीच्या सुट्या पाहूनच अनेक कुटुंबात पर्यटनाला जाण्याचा,

दिवाळीची लगबग : प्रवाशांची होतेय गैरसोयगोंदिया : दिवाळी म्हटले की सुट्या. प्रत्येक घरातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या दिवाळीच्या सुट्या पाहूनच अनेक कुटुंबात पर्यटनाला जाण्याचा, दुसऱ्या गावी पाहुणे म्हणून जाण्याचा बेत आखतात. त्यामुळे सध्या रेल्वे व बसगाड्यांमध्ये प्रवाशांची अलोट गर्दी दिसून येत आहे. यामुळे रेल्वे व एसटी महामंडळाच्या उत्पन्नात भर पडणार असली तरी प्रवाशांची गैरसोय होत आहे.दिवाळीच्या सुट्ट्यात अनेक जण सहकुटुंब बाहेरगावी नातलगांकडे जातात. लक्ष्मीपूजन आटोपताच घरोघरी मामाच्या गावाला जायची घाई असते. अशातच रेल्वे व बस स्थानकाच्या फलाटांवर सर्वत्र गर्दी दिसून येते. गोंदिया रेल्वे स्थानकावरून बालाघाट, छत्तीसगड, चंद्रपूर व नागपूरच्या दिशेने रेल्वेगाड्या धावतात. त्यामुळे गोंदिया रेल्वे स्थानकाच्या सर्वच फलाटांवर लोकांची एकच गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे रेल्वेगाडीत चढताना व उतरताना प्रवाशांना मोठीच कसरत करावी लागत आहे. प्रसंगी पॉकिटमारांची भीतीसुद्धा असते.अशीच गत बस स्थानकांच्या फलाटावरही दिसून येत आहे. बसमध्ये जागा न मिळाल्यास काही प्रवासी काळी-पिवळी गाडीचा आधार घेवून आपल्या नजीकपासच्या गावाचा प्रवास करतात. त्यातच काळीपिवळी गाडीमध्ये प्रवाशांना जनावरांप्रमाणे कोंबले जाते. त्यामुळे काही नागरिक बस किंवा रेल्वेच्या प्रवासालाच प्राधान्य देताना दिसतात. गोंदिया व तिरोडा आगारातील काही बसफेऱ्या वाढविण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुकर होण्यास बरीच मदत मिळणार आहे.दिवाळीनंतर मोठ्या प्रमाणात लग्न समारंभसुद्धा असतात. या समारंभांना जाण्यासाठी प्रवाशी बस स्थानकांवर एकच गर्दी करतात. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाला निश्चितच नफा होणार असल्याचे दिसून येत आहे. सध्या गोंदियाच्या रेल्वे स्थानकावरील सर्वच प्लॅटफॉर्मवर गर्दीचे वातावरण दिसून येत आहे. त्यामुळे तिकीट चेकींग करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)