शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकलमध्ये रेबीज इंजेक्शनचा तुडवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 06:00 IST

गोंदिया तालुक्यातील सेजगाव खुर्द येथील रहिवासी यश अमृत बिसेन (२७), किसनलाल दयाराम कावडे ़(५५), कीर्ती पटले (५५), अरुण किर्ती पटले (२२) या चार जणांना गुरूवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास एका पागल कुत्र्याने चावा घेतला. त्यामुळे त्यांना सुरूवातीला भानपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.

ठळक मुद्देरुग्णांना फटका : नागपूरपर्यंत पायपीट करण्याची वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तालुक्यातील सेजगाव खुर्द येथील चार जणांना पागल कुत्र्याने चावा घेतला. त्यामुळे या चारही जणांना गुरूवारी (दि.२६) रात्री येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (मेडिकल) दाखल करण्यात आले. मात्र येथे रेबीज इंजेक्शन नसल्याने या चारही जणांना नागपूर येथे रेफर करण्यात आले. यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. मेडिकल सुरू होऊन चार वर्षांचा कालावधी लोटूनही येथे आरोग्य विषयक सोयी सुविधांचा अभाव असून साध्या रेबीजच्या इंजेक्शनसाठी रुग्णांना नागपूरपर्यंत पायपीट करावी लागत आहे.गोंदिया तालुक्यातील सेजगाव खुर्द येथील रहिवासी यश अमृत बिसेन (२७), किसनलाल दयाराम कावडे ़(५५), कीर्ती पटले (५५), अरुण किर्ती पटले (२२) या चार जणांना गुरूवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास एका पागल कुत्र्याने चावा घेतला. त्यामुळे त्यांना सुरूवातीला भानपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार करुन गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रेफर करण्यात आले. या चारही रुग्णांना रेबीज ह्यूमन मोनीक्लोज एंटीबॉडी हे इंजेक्शन देण्याची गरज होती. मात्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हे इंजेक्शन उपलब्ध नसल्याने या चारही जणांना नागपूर येथे रेफर करण्यात आले. विशेष म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रेबीज इंजेक्शन उपलब्ध नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनी शहरातील मेडिकलमधून हे इंजेक्शन खरेदी करुन आणले. हा प्रकार नेहमीचाच असल्याचे रुग्णांनी सांगितले.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नेहमीच विविध कारणासाठी चर्चेत असते. साधे रेबीज इंजेक्शन एवढ्या मोठ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपलब्ध नसल्याने रुग्णांना नागपूरपर्यंत पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे या वैद्यकीय महाविद्यालयाचा नेमका उपयोग काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.शासनाकडून पुरवठाच नाहीकुत्रा चावल्यानंतर दिले जाणाऱ्या रेबीज इंजेक्शनचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला पुरवठाच होत नाही.त्यामुळे हे इंजेक्शन उपलब्ध नसल्याचे कारण येथील डॉक्टरांनी सांगितले. मात्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला पुरवठा करण्यात आलेल्या औषधांचे २ कोटी ८९ लाख रुपयांचे बिल थकीत असल्याने औषधांचा पुरवठा बंद करण्यात आल्याची माहिती आहे. यासाठी शासनाकडून निधी केव्हा मिळणार हे रुग्णालय प्रशासनाला सुध्दा माहिती नाही.

टॅग्स :medicineऔषधं