प्लॉट विकला नाही यावरून भिंतीवर ढकलले
By नरेश रहिले | Updated: January 29, 2024 18:10 IST2024-01-29T18:10:04+5:302024-01-29T18:10:20+5:30
तिरोडा तालुक्याच्या ठाणेगाव येथे २६ जानेवारी रोजी दुपारी १२:३० वाजता दरम्यान घडली.

प्लॉट विकला नाही यावरून भिंतीवर ढकलले
नरेश रहिले, गोंदिया : खरेदी केलेला प्लॉट परत मलाच का विकला नाही या कारणातून युवकाला भिंतीवर ढकलून दुखापत करण्यात आल्याची घटना तिरोडा तालुक्याच्या ठाणेगाव येथे २६ जानेवारी रोजी दुपारी १२:३० वाजता दरम्यान घडली.
येथील अशोक खोकटू शहारे (४४) यांनी आपला प्लॉट दुसऱ्या व्यक्तीला विकला असताना आरोपी अनिल भरत पटले (४४) रा. ठाणेगाव यांनी २६ जानेवारी रोजी दुपारी १२:३० वाजता अशोक शहारे यांना धक्का देऊन भिंतीवर ढकलले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला दुखापत झाली.
अनिल भरत पटले (४४,रा.ठाणेगाव) यांनी आपला प्लॉट अशोक खोकटू शहारे (४४) यांना विकला होता. तर तोच प्लॉट अशोक शहारे यांनी दुसऱ्याला विकून टाकला. यावरून अनिल पटले यांनी तो प्लॉट मलाच का विकला नाही यावरून भांडण करून अशोक शहारे यांना भिंतीवर ढकलल्याने त्यांना दुखापत झाली. या घटनेसंदर्भात तिरोडा पोलिसांनी आरोपीविरुद्ध २८ जानेवारी रोजी भादंवि कलम ३२५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस हवालदार बांते करीत आहेत.