शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
2
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
3
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
4
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
5
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
6
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
7
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
8
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
9
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
10
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
11
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
12
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
13
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
14
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
15
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
16
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
17
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
18
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
19
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
20
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
Daily Top 2Weekly Top 5

डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना त्वरीत वीज जोडणी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 06:00 IST

शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. विज वितरण कंपनीच्या लेटलतीफ धोरणाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. यावर तीव्र नाराजी व्यक्त करीत आ.सहषराम कोरोटे यांनी डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना त्वरीत जोडणी करुन देण्याचे निर्देश दिले. तसेच कामात कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाही करण्याचे निर्देश दिले.

ठळक मुद्देसहषराम कोरोटे। आढावा बैठकीत दिले निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : देवरी विधानसभा क्षेत्रातील अनेक शेतकऱ्यांनी कृषी पंपाच्या जोडणीसाठी डिमांड भरले. मात्र बराच कालावधी लोटूनही त्यांना अद्यापही विद्युत जोडणी करुन देण्यात आली नाही. परिणामी शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. विज वितरण कंपनीच्या लेटलतीफ धोरणाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. यावर तीव्र नाराजी व्यक्त करीत आ.सहषराम कोरोटे यांनी डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना त्वरीत जोडणी करुन देण्याचे निर्देश दिले. तसेच कामात कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाही करण्याचे निर्देश दिले.येथील तहसील कार्यालयात शुक्रवारी विविध विभागांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत उपस्थित अधिकाºयांना निर्देश देताना ते बोलत होते. बैठकीला माजी मंत्री भरत बहेकार, पं.स.सभापती अर्चना राऊत, जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष पुरुषोत्तम कटरे, माजी जि.प.अध्यक्ष उषा मेंढे, तालुका अध्यक्ष वासुदेव चुटे, शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष सोहन क्षीरसागर, रॉका तालुका अध्यक्ष तुकाराम बोहरे, बांधकाम सभापती उमेदलाल जैतवार, जिल्हा काँग्रेस महासचिव लखनलाल अग्रवाल, पं.स.सदस्य भरतलाल लिल्हारे, लक्ष्मण नागपुरे, कैलास अग्रवाल, प.स.सदस्य परिहार, यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. आ. कोरोटे यांनी सुरूवातीला विविध विभागांचा आढावा अधिकाऱ्यांकडून घेतला. आढावा देतांना अनेक त्रृट्या समोर आल्या. पंचायत समितीमार्फत मुंडीपार ग्रामपंचायतचे ग्रामसेवक हे पंचायत समिती सभापती उपसरपंच यांना विश्वासात न घेता मनमर्जीने कामे करण्याच्या आरोप उपस्थित आढावा बैठकीत सभापती अर्चना राऊत व विनोद अग्रवाल यांनी केला.यावर कोरोटे यांनी प्रत्यक्षात गटविकास अधिकारी यांना बोलावून मुंडीपार येथील ग्रामसेवकाला हटवून दुसºया ठिकाणी स्थानांतर करण्याचे निर्देश बीडीयो एस.टी.तुरकर यांना दिले. सोमवारपर्यंत बदली करण्याचे आदेश दिले.या वेळी त्यांनी शासकीय कार्यालयांमध्ये कामासाठी येणाऱ्या नागरिकांची कामे प्राधान्याने मार्गी करण्यास सांगितले. शासनातर्फे जनतेसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना जनतेपर्यंत पोहचवू याचा त्यांना लाभ देण्याचे निर्देश दिले.अनुउपस्थित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसआढावा बैठकीला उपस्थित राहण्याचे निर्देश सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र यानंतरही काही विभागाचे अधिकारी अनुउपस्थित होते.अशा अधिकाऱ्यांची यादी तयार करुन त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्याचे निर्देश आढावा बैठकीत आ.कोरोटे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.

टॅग्स :electricityवीज