शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

अडीच एकरात साडेनऊ लाखांच्या केळींचे उत्पादन

By admin | Updated: November 10, 2015 02:36 IST

देशाची आर्थिक व्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. शेतकरी बांधवांनी शेतीला आपले दैवत समजून शेतीवर निस्सीम प्रेम करावे.

पीक पद्धतीत बदल : कृषी अधिकारी तुमडाम यांचे मार्गदर्शन, कृषी विभागाची शिवार फेरीअरमचंद ठवरे बोंडगावदेवीदेशाची आर्थिक व्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. शेतकरी बांधवांनी शेतीला आपले दैवत समजून शेतीवर निस्सीम प्रेम करावे. शेतीला आवश्यक पोषक वातावरण निर्मितीसाठी तसेच नवनवीन पिकांचे उत्पादन घेण्यासाठी बळीराजाने वेळोवेळी आमच्या कृषी विभागाचा सल्ला घ्यावा. पारंपरिक शेती करण्याच्या पद्धतीला बगल देऊन अंशत: पीक पद्धतीमध्ये बदल करुन शेतीमधून नगदी उत्पन्न देणारे पीक घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम यांनी केले.तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने काढण्यात आलेल्या शिवार फेरीदरम्यान बोंडगाव, सुरबन, मालकनपूर येथील शेतकऱ्यांच्या शेतामधील लावण्यात आलेल्या केळीची बाग, सिमला मिर्ची, भाजीपाला, फळांचे निरीक्षण करताना उपस्थित शेतकऱ्यांना ते मार्गदर्शन करीत होते.तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या शिवार फेरीत नवेगावबांधचे मंडळ कृषी अधिकारी रामटेके, कृषी पर्यवेक्षक बी.टी. राऊत, एम.बी. ठाकूर, कृषी सहायक पवन काळे आदींचा समावेश होता. तालुक्यातील बोंडगाव-सुरबन येथील प्रगतीशील शेतकरी योगिराज हलमारे यांच्या केळीच्या बागेला भेट देऊन केळींचे उत्पादन व झाडांचे निरीक्षक कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले. योगिराज हलमारे या जागरूक शेतकऱ्याने धानाचे पीक न घेता कृषी विभागाच्या योग्य मार्गदर्शनाने केळीचे उत्पादन घेण्याचे ठरविले. अडीच एकर शेतीमध्ये तीन हजार ५०० केळीच्या झाडांची लागवड नोव्हेंबर २०१४ मध्ये त्यांनी केली. ११ महिन्यांच्या कालावधीमध्ये बागेतील संपूर्ण झाडांना केळाचे फळ लागलेले आहेत. एका झाडाला सरासरी २५ ते ३० किलो वजनाचे घड लावलेले दिसून येत आहेत. केळीच्या बागेमधून सदर शेतकऱ्याला एका झाडापासून २७५ रुपयांचे नगदी उत्पन्न मिळणार आहे. बागेतील तीन हजार ५०० झाडांपासून ९ लाख ६२ हजार ५०० रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. शेतामधूनच ११ रुपये प्रतिकिलोच्या भावाने केळीची विक्री सुरू आहे. अडीच एकरामध्ये केळीच्या बागेची लागवड करण्यासाठी त्या शेतकऱ्यास २.५० लाखांचा खर्च आल्याचे सांगण्यात आले. धानाचे पीक सोडून केळीचे उत्पादन घेणाऱ्या योगिराज हलमारे या शेतकऱ्यास पहिल्यावर्षी शुद्ध १२ हजार ५०० रुपयांचा नफा मिळणार आहे. केळीच्या एका झाडापासून त्या शेतकऱ्यास तीन वर्षे उत्पन्न मिळणार आहे. केळीची बाग लावण्यासाठी हेक्टरी ४५ हजाराचे अनुदान तसेच ठिंबक सिंचनाकरिता ५० हजारांचे अनुदान कृषी विभागाच्या वतीने देण्यात आल्याचे तुमडाम यांनी सांगितले. मागील वर्षी ७.६२ आर.मध्ये शेतकऱ्यांनी केळीच्या बागा लावल्या होत्या. यावर्षी तालुक्यातील शेतकऱ्यांनी १५ हेक्टरमध्ये केळीच्या बागा लावण्याचे नियोजन केले आहे. सुरबन, बोंडगाव, गोठणगाव, गांभारी इत्यादी ठिकाणी १२ शेतकऱ्यांनी शेडनेट तयार केले आहे. त्यात शिमला मिर्ची, भाजीपाला असे नगदी उत्पन्न देणारे पीक शेतकरी बंधू घेत आहेत. तालुक्यातील शेतकरी बांधवांनी आपल्या मनातील नैराश्य सोडून अंशत: पीक पद्धतीत बदल करुन शासनाच्या कृषी विभागाच्या मार्गदर्शनाने धानाव्यतिरिक्त केळी, मका, शिमला मिर्ची, कारले, हळद, वांगे, अद्रक, आंबा यासारखी नगदी उत्पन्न देणारी पिके घेण्याचा दृष्टीकोण अंगी बाळगल्यास शेतकऱ्यांच्या दारामध्ये सुख, शांती तसेच लक्ष्मी निश्चितच नांदेल, असा आशावाद तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम यांनी शिवार फेरी दरम्यान शेतकऱ्यांची हितगूज साधून व्यक्त केला. याप्रसंगी परिसरातील शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.