शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
3
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
6
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
7
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
8
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
9
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
10
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
11
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
12
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
13
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
14
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
15
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
16
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
17
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
18
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
19
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
20
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

अरूंद फूट ओव्हरब्रिजमुळे वाढणार समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 21:02 IST

मुंबईच्या एलफिन्स्टन रेल्वे स्थानकावर बनलेल्या फूट ओव्हरब्रिजवर एकच गोंधळ उडाला होता. या घटनेत अनेकांचे जीव गेले.

ठळक मुद्देउपयोगावर प्रश्नचिन्ह : अपघात टाळण्यासाठी रेल्वेने पाऊल उचलावे

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मुंबईच्या एलफिन्स्टन रेल्वे स्थानकावर बनलेल्या फूट ओव्हरब्रिजवर एकच गोंधळ उडाला होता. या घटनेत अनेकांचे जीव गेले. यानंतर रेल्वेच्या फूट ओव्हरब्रिजच्या उपयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. जवळपास सर्वच फूट ओव्हरबिजची तपासणी करण्यात आली. यात अरूंद फूट ओव्हरब्रिजमुळे समस्या वाढण्याचे चिन्ह दिसून आले.गोंदिया रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म-५ व ६ वर अत्यंत अरूंद फूट ओव्हरब्रिज (रॅम्प) आहे. केवळ दोन-तीन वर्षांपूर्वीच सदर अरूंद रॅम्प तयार करण्यात आले. हा रॅम्पसुद्धा धोकादायक ठरू शकतो, असे म्हटले जात आहे. या प्लॅटफॉर्मवरून विदर्भ एक्स्प्रेस व महाराष्टÑ एक्स्प्रेस सुटतात व येतात. याशिवाय बालाघाटच्या दिशेने ये-जा करणाºया गाड्यांमधून दरदिवसी हजारोंच्या संख्येने प्रवाशी ये-जा करतात. भविष्यात बालाघाटच्या पुढे रेल्वे मार्गाला देशाच्या उत्तर भागाशी जोडण्याची योजना आहे. अशात अतिरिक्त भार या दोन्ही प्लॅटफॉर्मवर दिला जावू शकतो. असे झाले तर सदर फूट ओव्हरब्रिज आवश्यकतेपेक्षा अधिक प्रवाशांचा भार सहन करू शकणार नाही, असे मानले जात आहे.अशा स्थितीत या अरूंद फूट ओव्हरब्रिजच्या जागेवर नवीन फूट ओव्हरब्रिजची गरज दर्शविली जात आहे. प्लॅटफॉर्म-२ वरसुद्धा सध्या एका नवीन फूट ओव्हरब्रिजचे काम सुरू आहे. हा फूट ओव्हरब्रिजसुद्धा अत्यंत अरूंद बनविण्यात येत आहे.मुंबईमध्ये झालेल्या घटनेचे मुख्य कारण अरूंद फूट ओव्हरब्रिज आहे. रेल्वे प्रशासनाने अशा दुर्घटना टाळण्याच्या दिशेने पाऊल उचलावे, अशी प्रवाशांची मागणी आहे. परंतु रेल्वे प्रशासन नवीन अरूंद पूल तयार करण्यातच गुंतले आहे.एस्कलेटर बनेल तर पूल हटेलगोंदिया रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक एच.ए. चौधरी यांच्याशी विचारपूस केल्यावर त्यांनी स्वीकार केले की, प्लॅटफॉर्म-५ व ६ वरील फूट ओव्हरब्रिज अत्यंत अरूंद आहे. रेल्वे विभागाचे काय नियोजन आहे, याबाबत काही सांगण्यास त्यांनी असमर्थता व्यक्त केली. ते म्हणाले की, जवळ भविष्यात सदर प्लॅटफॉर्मवर एस्कलेटर लावण्याची गरज पडू शकते. परंतु यासाठी आणखी वेळ आहे. त्यावेळी अरूंद पुलाऐवजी मोठे मोठे पूल तयार करावे लागेल, असे त्यांनी सांगितले.