शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

आराखडा तातडीने तयार करा

By admin | Updated: November 11, 2015 01:23 IST

जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा विकास करण्यासोबतच स्थानिकांना या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्याची संधी आहे.

पालकमंत्र्याचे निर्देश : पर्यटनस्थळांचा विकास व स्थानिकांना रोजगारगोंदिया :जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा विकास करण्यासोबतच स्थानिकांना या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्याची संधी आहे. जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची विकास कामे वेळीच व नियोजनबद्ध रितीने करण्यासाठी जिल्ह्याचा पर्यटन विकास आराखडा तातडीने तयार करण्याचे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात शनिवारी जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या विकासाबाबत जिल्हा पर्यटन समितीच्या सभेत ते बोलत होते. याप्रसंगी समितीचे पदाधिकारी प्रभारी जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, उपवन संरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, जिल्हा नियोजन अधिकारी बकूल घाटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता शर्मा, वन विकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक यांचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.पालकमंत्री बडोले म्हणाले, जिल्ह्यात पर्यटनाच्या विकासासाठी भरपूर संधी आहे. जास्तीत जास्त पर्यटक नवेगावबांध, नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला भेट देण्यासाठी येतात. परंतु आवश्यक त्या सुविधा नसल्यामुळे पर्यटकांचा हिरमोड होतो. मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात पर्यटक येण्यासाठी आता चांगल्या प्रकारचे कालबद्ध नियोजन करून जिल्ह्यातील इतरही पर्यटनस्थळांच्या विकासाची कामे दर्जेदार व वेळीच झाली पाहिजेत, असे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. महाशिवरात्रीनिमित्त भाविक मोठ्या संख्येने प्रतापगड येथे येतात. तेथे भाविकांसाठी यात्रेच्या काळात पिण्याच्या पाण्याची सुविधा होईल, याकडे लक्ष द्यावे. कचारगड हे लाखो आदिवासी बांधवांचे श्रद्धास्थान आहे. तेथे पिण्याच्या पाण्याची सुविधा व पायऱ्या बांधण्याची कामे तातडीने पूर्ण करावे. सौंदड येथील राष्ट्रीय महामार्गाच्या शेजारी असलेल्या तलावात बोटिंगची सुविधा उपलब्ध करून पर्यटकांना तेथे आकर्षित करून स्थानिकांना त्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देता येईल, याची चाचपणी करावी. नागझिरा अभयारण्यात पर्यटकांच्या सेवेकरिता असलेल्या टाटा पिक अप वाहनांची स्थितीसुद्धा पालकमंत्र्यांनी या वेळी जाणूण घेतली.जिल्ह्यातील ११ पर्यटन स्थळांच्या विकासाचा ४८ कोटी रूपयांचा प्रस्ताव पर्यटन विभागाकडे दिल्याचे घाटे यांनी सांगितले. तसेच विविध विभागाकडून पर्यटन स्थळांच्या विकासाबाबत करण्यात येत असलेल्या कामांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी या वेळी पालकमंत्री राजकुमार बडोले यांना दिली. (प्रतिनिधी)