११ हजार व्यक्तींवर पोलिसांनी केली कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 05:00 AM2020-05-26T05:00:00+5:302020-05-26T05:01:45+5:30

कोरोनाचा वाढता धोका बघता देशात २३ मार्चपासून ‘लॉकडाऊन’ करण्यात आले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे सुरूवातीपासूनच सांगीतले जात आहे. मात्र तरिही घराबाहेर विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या काही कमी नाही.

Police took action against 11,000 people | ११ हजार व्यक्तींवर पोलिसांनी केली कारवाई

११ हजार व्यक्तींवर पोलिसांनी केली कारवाई

Next
ठळक मुद्देविनाकारण फिरणे पडले महागात : २३ लाखांचा दंड ठोठावला

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोनाचा प्रादुर्भाव बघता देशात ‘लॉकडाऊन’ करण्यात आले तेव्हापासूनच नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. असे असतानाही विनाकारण फिरणाऱ्या १० हजार ६४४ व्यक्तींवर वाहतूक विभागाकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. २३ मार्चपासून पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या या कारवायांत २२ लाख ६० हजार ९०० रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
कोरोनाचा वाढता धोका बघता देशात २३ मार्चपासून ‘लॉकडाऊन’ करण्यात आले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे सुरूवातीपासूनच सांगीतले जात आहे. मात्र तरिही घराबाहेर विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. मात्र यामुळे प्रशासनाच्या मेहनतीवर पाणी फेरण्याचे कामच अशी व्यक्ती करीत असल्याने त्यांना धडा शिकविणे गरजेचे झाले होते. परिणामी वाहतूक नियंत्रण शाखेने विनाकारण रस्त्यांवर फिरणाºयांवर कारवाई करण्यास सुरूवात केली. २३ मार्चपासून आतापर्यंत करण्यात आलेल्या या कारवायांत १० हजार ६४४ जणांना दणका देण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, २ महिन्यांच्या काळात वाहतूक नियंत्रण शाखेने शहरात केलेल्या कारवायांचा हा आकडा असून आणखी कठोरतेने कारवाई केल्या असता तर मात्र हीच संख्या दुप्पट व तिप्पट गेली असती यात शंका नाही. रक्ताचे पाणी करून पोलीस कर्मचारी नागरिकांना घराबाहेर न पडण्यास सांगत होते. मात्र तरिही काहीही काम नसताना मजा म्हणून फिरणाºयांना अखेर पोलिसी कारवाईला पुढे जावे लागले. अशा या १० हजार ६४४ जणांना पोलिसांनी २२ लाख ६० हजार ९०० रूपयांचा दंडही ठोठावला.

डबलसीट फिरणाºया १२७ जणांवर गुन्हा दाखल
‘लॉकडाऊन’ सुरू असून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडण्यास आजही मनाई आहे. शिवाय ९ मे पासून दुचाकीवर डबलसीट फिरणाºयावरही बंदी लावण्यात आली आहे. मात्र तरिही नियमांचे उल्लंघन करून शहरात डबलसीट फिरणाºया १२७ जणांवर वाहतूक नियंत्रण शाखेने भादंविच्या कलम १८८ अंतर्गत गु्न्हा नोंद केला आहे.

Web Title: Police took action against 11,000 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.