शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांचे निवारे जीर्ण आणि ओसाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 00:49 IST

कायदा, सुव्यवस्था व शांतता कायम रहावी यासाठी २४ तास कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासनाकडून मुबलक सुविधा मिळावी,

शासनाकडून अपेक्षाभंग : २४ तास कर्तव्य बजावूनही मूलभूत सुविधांपासून वंचितलोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : कायदा, सुव्यवस्था व शांतता कायम रहावी यासाठी २४ तास कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासनाकडून मुबलक सुविधा मिळावी, अशी अपेक्षा आहे. परंतु याच कर्मचाऱ्यांना परिश्रम करुनही मूलभूत सुविधा मिळत नसल्याने त्यांचा शासनाकडून अपेक्षाभंग होत आहे. त्यामुळे पोलीस कर्मचारी अद्यापही तणावात कर्तव्य बजावत आहेत.लोकसंख्या वाढीसह कायदा, सुव्यवस्था व शांतता ठेवण्यासाठी पोलीस विभागात कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ अपेक्षित आहे. अनेक पोलीस ठाण्यात तसेच जिल्हा पातळीवर रिक्त असलेली पोलीस कर्मचाऱ्यांची पदे भरण्याकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. आमगाव तालुक्यातील ८४ गावांतील कायदा, सुव्यवस्था व शांतता ठेवण्यासाठी पोलीस विभागाला तारेवरची कसरत करावी लागते. दीड लाख लोकसंख्या असलेल्या तालुक्यात कर्तव्य बजावणारे विभाग हतबल ठरत आहे. येथील मंजूर पदेच ७७ आहेत. कार्यरत पदे ६२ असून पोलीस निरीक्षकांसह चार उपनिरीक्षकांची पदे मंज़ूर आहेत. परंतु प्रत्यक्षात केवळ दोन कर्मचारी कार्यरत असल्यामुळे कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना ताण सहन करावा लागत आहे. विभागात तांत्रिक दृष्टीने परिपूर्ण सोयीसुविधांची गरज आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही या विभागाला संगणकीय दृष्टीने सक्षम करण्यात शासन अपयशी ठरले. आजही कर्मचारी वर्ग खासगी संगणकांच्या सहाय्याने विभागातील कार्यालयास कामे करित आहेत. काही ठिकाणी मोजके संगणक आहेत, तर त्यांना नेटवर्कअभावी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. विभागातील प्रत्येक ठाणे परिसरात कर्मचाऱ्यांना कुटुंबाच्या वास्तव्यासाठी जीर्ण इमारतींचा आश्रय घ्यावा लागत आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचे वास्तव्य धोक्यात आले आहे. काही इमारती ओसाड पडल्या आहेत. या इमारतींना पूर्ण नवीन बांधकामाची आवश्यकता आहे. परंतु शासनाकडे या प्रस्तावित इमारतींचा प्रस्तावच धूळ खात आहे. कर्मचाऱ्यांच्या कुटुंब कल्याण योजनांचे नियोजन नसल्याने त्यांना मूलभूत सोयी बहाल करण्यात आले नाही. कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य सुविधा, क्रीडांगण, मनोरंजन कक्ष, ग्रंथालय, ई-लायब्ररी, व्यायाम शाळा या सुविधाच नाहीत. त्यामुळे खासगीरित्या या सुविधा त्यांना मिळवून घ्यावे लागत आहे. पोलीस विभागातील कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना उत्तम आरोग्य, वेतनश्रेणी, राहणीमान व शिक्षण याबाबत शासनाकडूनच अपेक्षाभंग होत असल्याचे चित्र आहे.