‘अजित पवारांशी आदल्या दिवशी फोनवरून संवाद’; रोहित पवारांच्या आरोपावर प्रफुल पटेलांनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 08:48 IST2026-02-19T08:48:07+5:302026-02-19T08:48:55+5:30
पटेल म्हणाले, मी फार जबाबदार व्यक्ती असून, मी फार संयमाने बोलेन व माझ्याकडे जोपर्यंत पुरावे येणार नाहीत तोपर्यंत मी काहीही बोलणार नाही.

‘अजित पवारांशी आदल्या दिवशी फोनवरून संवाद’; रोहित पवारांच्या आरोपावर प्रफुल पटेलांनी स्पष्टच सांगितलं
गोंदिया : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या आदल्या दिवशी पूर्व विदर्भातील एका नेत्याचा फोन आल्याचा आरोप आ. रोहित पवार यांनी केला होता. यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते खा. प्रफुल पटेल यांनी प्रतिक्रिया देताना अपघाताच्या आदल्या दिवशी मी दिल्लीत होतो. तेव्हा शेतकऱ्यांच्या धानाच्या थकीत चुकाऱ्यांसंदर्भात मी त्यांना फोन केला होता. दादांनी यावर मी नक्कीच चुकाऱ्यांची व्यवस्था करतो असे सांगितले होते, असे खा. प्रफुल पटेल यांनी सांगितले.
पटेल म्हणाले, मी फार जबाबदार व्यक्ती असून, मी फार संयमाने बोलेन व माझ्याकडे जोपर्यंत पुरावे येणार नाहीत तोपर्यंत मी काहीही बोलणार नाही.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या...
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे आणि खा. प्रफुल्ल पटेल आडकाठी आणतात का, या प्रश्नावर खा. सुप्रिया सुळे यांनी ‘राम-कृष्ण हरी,’ अशी प्रतिक्रिया पत्रकारांना दिली.
१६ लाख विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा; कॉपीसाठी मदत केली तर कारवाई होणार
अजित पवार आणि माझ्यामध्ये काय बोलणे झाले होते, हे आम्हा बहीण-भावाला माहीत आहे. आता माझा भाऊच गेला; मग कशाला खरे-खोटे करायचे? कशाला उणीदुणी काढायची?