शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोलच्या दराचा पुन्हा भडका, प्रीमिअम पेट्रोलचे ९९.६४ पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 05:00 IST

मागील चार महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत सातत्याने वाढ होत असून, मागील चार महिन्यांत पेट्रोलचे दर ११ रुपये, तर डिझेलचे दर सहा रुपयांनी वाढले आहेत. मंगळवारी पेट्रोलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. त्यामुळे १ लिटर प्रीमिअम पेट्रोलसाठी आता वाहनचालकांना ९९.६४ रुपये मोजावे लागणार आहेत; त्यामुळे वाहनचालकांना थेट शंभर रुपयांची नोट द्यावी लागणार आहे. 

ठळक मुद्देभाजीपाल्याचे दर वाढले : सर्वसामान्य बसताेय फटका

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत सातत्याने वाढ केली जात आहे. मंगळवारी गोंदिया येथे साधे पेट्राेल ९६.८१ रुपये प्रतिलिटर, तर प्रीमिअम पेट्रोलचा दर ९९.६४ रुपये प्रतिलिटर होता. डिझेलचा दरही ८५.२५ रुपये होता. पेट्रोलचा दर १०० रुपयांवर गेल्याने याचा परिणाम इतरही गोष्टींवर होत आहे. महागाईत वाढ होत असल्याने सर्वसामान्यांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. मागील चार महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत सातत्याने वाढ होत असून, मागील चार महिन्यांत पेट्रोलचे दर ११ रुपये, तर डिझेलचे दर सहा रुपयांनी वाढले आहेत. मंगळवारी पेट्रोलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. त्यामुळे १ लिटर प्रीमिअम पेट्रोलसाठी आता वाहनचालकांना ९९.६४ रुपये मोजावे लागणार आहेत; त्यामुळे वाहनचालकांना थेट शंभर रुपयांची नोट द्यावी लागणार आहे. पेट्रोलच्या दरवाढीमुळे वाहतूक भाड्यातही वाढ झाल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या दरातही वाढ झाली आहे. मंगळवारी शहरातील बाजारपेठेत भाजीपाल्याचे दरही काही प्रमाणात वधारले होते. त्यामुळे पेट्रोल दरवाढीचा फटका थेट गोरगरीब आणि सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे बजेट बिघडत आहे; तर गृहिणींना महिन्याचे बजेट सांभाळताना मोठी कसरत करावी लागत आहे. पेट्रोल-डिझेलसह गॅस सिलिंडरच्या किमतीही ५० रुपयांनी वाढल्या आहेत. १० फेब्रुवारीला गॅस सिलिंडरचे दर ७८५ रुपये होते. त्यात आता पुन्हा ५० रुपयांनी वाढ झाल्याने हे दर ८३५ रुपयांवर पोहोचले आहेत. त्यावर केवळ ५० ते ६० रुपये अनुदान मिळते. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य त्रस्त झाल्याचे चित्र आहे.पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीमुळे ऑटोे आणि बसेसच्या भाड्यात सुध्दा वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे याचा पुन्हा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसण्याची शक्यता आहे. सातत्याने वाढ होत असलेल्या दरामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये रोष व्याप्त आहे. 

दिवसेंदिवस वाढणारे पेट्रोल-डिझेलचे दर हे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडत आहे. कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर आता कुठे संसाराची घडी बसली होती. मात्र  वाढत्या पेट्रोल-डिझेलने गोरगरिबांचे हाल होत आहेत.’दिव्या भगत  सामाजिक कार्यकर्ता

जिल्ह्यात एकीकडे तरुणांना अपेक्षित रोजगार नाही तर दुसरीकडे  वाढत्या महागाईचा सामना करावा लागत आहे. कोरोनाच्या काळात वाहतूक व्यवस्था बंद झाली होती. मात्र त्यानंतर आता वाढत्या महागाईच्या संकटाने जगणे मुश्कील झाले आहे. -देवा शेंडे , सुशिक्षित तरुण, गोंदिया

 

टॅग्स :Petrolपेट्रोलCylinderगॅस सिलेंडर