शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून वनमहोत्सव १ जुलैला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2017 01:21 IST

राज्य शासनाच्या ४ कोटी वृक्षलागवड अभियानांतर्गत जवळील ग्राम बोदरा-देऊळगाव येथे गावकऱ्यांच्या सक्रिय सहभागातून

ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग : बोदरा येथे २२०० झाडांची लागवड लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : राज्य शासनाच्या ४ कोटी वृक्षलागवड अभियानांतर्गत जवळील ग्राम बोदरा-देऊळगाव येथे गावकऱ्यांच्या सक्रिय सहभागातून येत्या १ जुलै रोजी वनमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी क्षेत्र सहायक कार्यालयांतर्गत बोदरा बीटमध्ये वनमहोत्सवाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. बोदरा येथील पटाच्या दानी जवळील झुडपी जंगल २३७/२ मधील २ हेक्टर जागेत बोदरा-देऊळगाव येथील गावकऱ्यांच्या लोकसहभागातून विविध प्रजातींच्या २२०० वृक्षांची लागवड शनिवारी (दि.१) करण्यात येणार असल्याचे प्रभारी क्षेत्र सहायक एस.एन.पंधरे यांनी सांगितले.१ जुुलैच्या आयोजित वृक्ष लागवड कार्यक्रमात बोदरा व देऊळगाव गावकऱ्यांच्या प्रतिसाद मिळून लोकसहभागातून २ हजार २०० वृक्षांची लागवड श्रमदानातून केली जाणार आहे. क्षेत्र सहायक एस.एन.पंधरे, वनरक्षक पी.टी.दहिवले यांनी ग्रामस्थांची सभा घेऊन वृक्ष लागवडीसंबंधी जाणीव जागृती केली.मानवाला वृक्ष किती फायदेशीर आहेत, गावाजवळील जंगलापासून होणारे दैनंदिन फायदे याबाबद माहिती देऊन गावकऱ्यांचे मन वळविण्यात वनविभागाचे अधिकारी यशस्वी झाले. शनिवारचा (दि.१) वनमहोत्सव साजरा करण्यासाठी बोदरा व देऊळगाव येथील ग्रामस्थ सरसावले. गावातील वन समितीचे अध्यक्ष भाष्कर कवरे, सरपंच जयवंता झोळे, पोलीस पाटील यशवंत कापगते, पो.पा. नाशिक कापगते, ग्रा.पं.सदस्य आनंदराव चौधरी, विनोद बनकर, सदस्या लक्ष्मी उईके, निरुता नंदेश्वर, मनोज झोळे, पुरुषोत्तम बडोले, सदस्या लक्ष्मी उईके, निरुता नंदेश्वर, मनोज झोळे, पुरुषोत्तम बडोले, तेजराम झोळे, सतिश कावळे तसेच गावकरी वनमहोत्सवासाठी अविरत प्रयत्न घेत आहेत. पहिल्या प्रथमच मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड होत असल्याने गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन हजारावर झाडांची लागवड स्वत: गावकरी करणार आहेत.वृक्ष लागवडीचा हा कार्यक्रम बोदरा गावात यशस्वी झाल्यास हे गाव येणाऱ्या काळात एक आदर्श गाव म्हणून ओळखले जाईल. सहभागी होणाऱ्यांसाठी महाप्रसादाचे आयोजन वृक्ष लागवडीसाठी गावकरी जोमाने कामाला लागले असून यात त्यांचे सहकार्य लाभाणार आहे. तरिही या उपक्रमात सहभागी होणाऱ्यांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. वृक्ष लागवड उपक्रमात सहभागी झालेल्यांना या महाप्रसादाचा लाभ घेता येणार आहे.