शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

सुप्रशासनासाठी सहभाग महत्त्वाचा

By admin | Updated: November 23, 2015 01:38 IST

माहितीचा अधिकार हा क्रांतिकारक कायदा आहे. या कायद्याचा थेट संबध प्रशासनाशी येतो.

माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड : माहितीचा अधिकार कायद्याची अंमलबजावणी गोंदिया : माहितीचा अधिकार हा क्रांतिकारक कायदा आहे. या कायद्याचा थेट संबध प्रशासनाशी येतो. लोकांच्या सहभागातून निर्णय घेण्यात येत असल्यामुळे सुप्रशासन स्थापित होण्यासाठी लोकांचा सहभाग महत्वाचा आहे, असे मत राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी व्यक्त केले. शनिवारी २१ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन समितीच्या सभागृहात माहितीचा अधिकार कायद्याच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत गायकवाड बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. गायकवाड पुढे म्हणाले, लोकांच्या सहभागातून निर्णय घेतले जातात याची माहिती नागरिकांना झाली पाहिजे. भारतात या कायद्याबाबत मोठ्या प्रमाणात जागृती करण्यात आली आहे. पारदर्शकतेची संस्कृती शासनव्यवस्थेत माहितीचा अधिकार कायद्यामुळे येत आहे. वेगवेगळ्या प्रकारचे कर लोक भरतात. लोकांच्या पैशातून निर्णय घेतले जातात. लोकांचा सहभाग, निर्णय प्रक्रिया व जवाबदारीची भावना प्रशासनात येत आहे. देशात या कायद्याच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र अव्वल आहे. माहितीचा अधिकार कायद्यांतर्गत माहिती मागणाऱ्या व्यक्तीला ३० दिवसांच्या आतच माहिती द्यावी. प्रत्येक विभागाने त्यांच्या संकेतस्थळावर १७ बाबींची माहिती उपलब्ध करून द्यावी. या कायद्यामुळे पारदर्शकता आल्याचे सांगून गायकवाड म्हणाले, काही प्रमाणात ब्लॅकमेलिंगसुध्दा केली जाते. या कायद्याचा दुरूपयोग कोणीही करू नये. हा कायदा दुधारी शस्त्र आहे. माहितीचा अधिकार कायद्याला चांगले भवितव्य पाहिजे असेल तर व्यक्तिगत माहिती मागू नये, असेही ते म्हणाले. डॉ. सूर्यवंशी म्हणाले, या कायद्याबाबत अनेकांमध्ये संभ्रम होता. राज्याचे मुख्य माहिती आयुक्त यांनी प्रत्यक्ष मार्गदर्शन करून अनेकांचे समाधान केले आहे. या कायद्यामुळे पारदर्शकता येऊन भ्रष्टाचाराला आळा बसण्यास मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले. निवासी उपजिल्हाधिकारी लोणकर यांनी माहितीच्या अधिकाराांतर्गत प्राप्त अर्ज व त्याबाबत केलेली कार्यवाही याबाबतची माहिती दिली. या वेळी राज्य मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी, उपस्थित अधिकाऱ्यांनी या कायद्याच्या अनुषंगाने विचारलेल्या विविध प्रश्नांचे उत्तरे दिली व अधिकाऱ्यांच्या मनातील या कायद्याबाबत असलेली भीती दूर केली. बैठकीत विविध विभागाचे अपिलीय अधिकारी, जनमाहिती अधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)