शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
3
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
6
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
7
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
8
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
9
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
10
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
11
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
12
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
13
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
14
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
15
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
16
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
17
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
18
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
19
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
20
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

शहरात बनणार पार्किंग झोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 20:59 IST

शहरातील बेशीस्त पार्किंग व्यवस्था, पोलीस कर्मचाºयांसाठी क्वाटर्स व रावणवाडी तसेच रामनगर पोलीस ठाण्यांच्या बांधकामाच्या विषयाला घेऊन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ यांच्यासोबत बैठक घेतली.

ठळक मुद्देरामनगर-रावणवाडी ठाण्यांचे बांधकाम : आमदार अग्रवाल यांची अधीक्षकांसोबत बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील बेशीस्त पार्किंग व्यवस्था, पोलीस कर्मचाºयांसाठी क्वाटर्स व रावणवाडी तसेच रामनगर पोलीस ठाण्यांच्या बांधकामाच्या विषयाला घेऊन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ यांच्यासोबत बैठक घेतली. बैठकीत आमदार अग्रवाल यांनी मांडलेल्या विषयांवर चर्चा घडून त्यावर लगेच कारवाईचा निर्णय घेण्यात आला.शहरात पार्किंगची व्यवस्था नसल्याने शहरवासीयांना होत असलेली अडचण बघता आमदार अग्रवाल यांनी पार्किंगचा विषय बैठकीत मांडला. यावर नगरसेवक शकील मंसूरी यांनी अग्रसेन गेट ते गोंिदया गॅस एजंसी, सुभाष शाळेचे मैदान, शहर पोलीस ठाण्यामागील पार्किंगसाठीची आरक्षित जागा, बाजारातील दिल्ली होटल ते दुर्गा चौक पर्यंतची गल्लीची सफाई करून पार्कींगची व्यवस्था करता येणार असल्याचे सांगितले. यावर पोलीस अधीक्षक भुजबळ यांनी अतिक्रमण तोडून शहरातील रस्ते रूंद करण्या बाबत नगर परिषद मुख्याधिकारी चंदन पाटील यांना माहिती मागीतली.यानंतर आमदार अग्रवाल यांनी रावणवाडी व रामनगर पोलीस ठाण्यांचा विषय मांडला. याप्रसंगी अधीक्षक भुजबळ यांनी, रावणवाडी येथे ठाण्यासाठी वन विभागाची जागा असून वन विभागाकडून काहीच कारवाई होत नसल्याचे सांगीतले. तर रामनगर शाळेसमोरील मैदान रामनगर पोलीस ठाण्यासाठी आरक्षीत त्याच्या हस्तांतरणासाठी नगर परिषदेकडून काहीच प्रयत्न होत नसल्याचे सांगीतले. यावर आमदार अग्रवाल यांनी वन अधिकारी युवराज यांच्याशी फोनवर चर्चा करून रावणवाडी येथील जागा पोलीस विभागाला आठवड्यात हस्तांतरीत करण्याचे निर्देश दिले. तर रामनगर पोलीस ठाण्यासाठीही आठवड्यात जागा उपलब्ध करवून देण्याचे आश्वासन मुख्याधिकारी पाटील यांनी दिले. शिवाय मनोहर चौक स्थित पोलीस लाईनच्या जागेवर १५० पोलीस क्वाटर्स तयार करण्यावर चर्चा या बैठकीत झाली. याप्रसंगी आमदार अग्रवाल यांनी पोलीस महासंचालकांसोबत झालेल्या बैठकीची माहिती दिली. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, कार्यकारी अभियंता चव्हाण व पोलीस विभागाचे वास्तूवीद यांनी इमारतींचे नकाशे ठेवले असता त्यांचे अवलोकन करून त्यावर चर्चा करण्यात आली.बाजार समिती व पांढराबोडीत पोलीस चौकीया बैठकीत आमदार अग्रवाल यांनी बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण यांना बाजार समितीच्या यार्डात पोलीस चौकीसाठी मंजूर १५ लाख रूपयांच्या निधीतून पोलीस चौकीचे काम त्वरीत सुरू करण्याचे निर्देश दिले. तसेच पांढराबोडी येथे पोलीस चौकीचा प्रस्ताव तयार करण्यास सांगीतले. विशेष म्हणजे पार्कीगच्या समस्येवर तोडगा म्हणून उड्डाणपूला खालील जागेत पार्कींग क्षेत्र बनविण्याचा सल्ला देत आमदार अग्रवाल यांनी या संदर्भात लवकरच नगर परिषदेकडून निविदा बोलाविण्यास सांगीतले.बैठकीला उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, जिल्हा नगर रचनाकार दीपक वºहाडे, पोलीस उप अधीक्षक (गृह) दिपाली खन्ना, उप अधीक्षक भूमी अभिलेख सतीश पवार, पोलीस निरीक्षक मनोहर दाभाडे, रामनगरचे निरीक्षक संजय देशमुख, रावणवाडीचे सचीन सांडभोर, कॉंग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष अशोक चौधरी, अ‍ॅड. योगेश अग्रवाल, जहीर अहमद यांच्यासह अन्य अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.