शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या मागणीसाठी पालकांची जि.प.वर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 06:00 IST

शिक्षकांची रिक्त पदे भरण्याकरिता गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती गोरेगाव यांना ३० जुलै २०१९ ला लेखी निवेदन देण्यात आले होते. परंतु गटशिक्षणाधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष करुन शिक्षकांची व्यवस्था केलीच नाही. म्हणून संतप्त पालकांनी जि.प.वर धडक देऊन उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांना लेखी निवेदन दिले.

ठळक मुद्देवर्षभरापासून शिक्षकाचे पद रिक्त : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कनिंबा : गोरेगाव तालुक्यातील निंबा शाळेतील शिक्षकांची तीन पदे गेल्या वर्षभरापासून रिक्त आहेत. पंचायत समिती आणि शिक्षण विभागाकडे यासंदर्भात वांरवार तक्रारी करुन सुध्दा रिक्त पद भरण्यात आले नाही. त्यामुळे पालकांनी मंगळवारी जि.प.वर धडक देऊन शिक्षकाची नियुक्ती करण्याची मागणी केली.जिल्हा परिषदेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा दिवसेंदिवस खालावत चालल्याने पटसंख्याही दिवसेंदिवस कमी होत आहे. शिक्षकांची रिक्त पदे अद्यापही भरण्यात आली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता खालावत चालली असून शैक्षणिक नुकसान होत आहे. गोरेगाव तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या निंबा येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक डिजीटल शाळेत ही असेच चित्र आहे. येथे इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत वर्ग असून शिक्षकांची सहा पदे मंजूर आहेत.मात्र मागील एक वर्षापासून शिक्षकांची तीन पदे रिक्त आहेत.परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यासंदर्भात शिक्षण विभागाकडे वारंवार शिक्षकांची रिक्त पदे भरण्याची मागणी करुन निवेदन देण्यात आले. पण त्याचा कसलाही उपयोग झाला नाही.त्यामुळे पालकांमध्ये रोष व्याप्त आहे. संतप्त पालकांनी या विरोधात जि.प.कार्यावर धडक दिली.निंबा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ११४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या संपूर्ण विद्यार्थ्यांची जवाबदारी केवळ तीन शिक्षकांवर आहे. तर मुख्याध्यापक शिक्षकाचा अर्धा वेळ कागदपत्रे अद्यावत ठेवण्यात निघून जातो. एक शिक्षक अनाधिकृतपणे सुट्या मारतो पंधरा पंधरा दिवस शाळेत गैरहजर असतो. एक शिक्षक बऱ्याचदा डीआयईसीपीडीच्या प्रशिक्षणात पाठविला जातो. त्यामुळे मागील एका वर्षापासून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.शिक्षकांची रिक्त पदे भरण्याकरिता गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती गोरेगाव यांना ३० जुलै २०१९ ला लेखी निवेदन देण्यात आले होते. परंतु गटशिक्षणाधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष करुन शिक्षकांची व्यवस्था केलीच नाही. म्हणून संतप्त पालकांनी जि.प.वर धडक देऊन उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांना लेखी निवेदन दिले. यावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांनी दोन दिवसात शिक्षकाची नियुक्ती करण्याचे आश्वासन दिले.मात्र यानंतरही शिक्षकाची नियुक्ती न केल्यास जि.प.समोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा पालकांनी दिला आहे.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाTeacherशिक्षक