शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

खासगी शाळांच्या शुल्कवाढीने पालक त्रस्त

By admin | Updated: April 27, 2016 01:57 IST

शुल्क नियमन कायद्याच्या अंमलबजावणीस सुरु वात न झाल्यामुळे जिल्ह्यातील खासगी व्यवस्थापनाच्या शाळांनी

वाढता विरोध: शिक्षण विभागाचे दुर्लक्ष; लूट थांबविण्याची मागणी गोंदिया : शुल्क नियमन कायद्याच्या अंमलबजावणीस सुरु वात न झाल्यामुळे जिल्ह्यातील खासगी व्यवस्थापनाच्या शाळांनी येत्या सत्रासाठी मनमानी पद्धतीने शुल्कवाढ केली आहे. ही पालकांची लूट आहे. शुल्कवाढीवर नियंत्रणठेवण्यासाठी शिक्षण विभागाने कठोर पावले उचलावीत, अशी पालकांची मागणी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा दर्जा दिवसेंदिवस खालावत असल्याने आर्थिक स्थिती सर्वसामान्य असतानाही पालक पाल्याच्या शिक्षणासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळा जवळ करू लागले आहेत. अलीकडेच खासगी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या स्पर्धेत आपला पाल्य मागे राहू नये या उद्देशाने पालकदेखील हजारो रु पयांचे शुल्क निमुटपणे भरत आहेत. मात्र येत्या शैक्षणिक सत्रासाठी काही शाळांनी अव्वाच्या सव्वा शैक्षणिक शुल्क वाढविले आहे. त्यामळे पालक हतबल झाले आहे. दरवर्षी शुल्कवाढ होत असल्याने पालक वर्ग आता त्रस्त झाला असून या शाळा शुल्क वाढीचा विरोध करू लागले आहे. (शहर प्रतिनिधी) शिक्षण विभागाला माहिती दिली जात नाही खासगी शाळांनी शुल्कवाढ केल्याची माहिती शिक्षण विभागाला देणे बंधनकारक असताना या शाळांद्वारा माहिती दिली जात नाही. हे कार्यालय खासगी शाळांवर कारवाई करत नसल्याने शाळा व्यवस्थापन मनमानी शुल्क उकळतात. शुल्क नियमन कायदा अस्तित्वात असतानाही त्याची अंमलबजावणी होत नसल्याने खासगी शाळांकडून मनमानी पद्धतीने शुल्कवाढ करण्यात आली आहे. शिक्षण विभागाने ठोस पावले उचलून पालकांना न्याय देण्याची गरज आहे, हा तर पैसे कमविण्याचा गोरखधंदा खासगी शाळांनी पालकांना लुटण्याची जणू स्पर्धाच सुरु केली आहे. शुल्कवाढीसोबत, पुस्तके, गणवेष, दफ्तर, टॉय आणि सर्व साहित्य शाळेतून खरेदी करावे, अशी सक्ती केली जात आहे व यासाठी मार्केटपेक्षा अधिक किमतीने साहित्याची विक्र ी केल्या जात आहे. पालकांच्या अगतीकतेचा फायदा घेऊन पैसे उकळण्याचा गोरखधंदा या शाळा व्यवस्थापकांनी सुरु केला आहे. याकडे शिक्षण विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. अपात्र शिक्षकांचा भरणा खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये सद्यस्थितीत मनमानी पद्धतीने कारभार सुरु आहे. डीएड, बीएड, शिक्षकांऐवजी बारावी, पदवीधर उमेदवारांना अल्पशा मानधनावर नियुक्त केल्या जात असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्यच धोक्यात येण्याची शक्यता आहे.