शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
4
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
5
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
6
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
7
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
8
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
9
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
10
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
11
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
12
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
13
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
14
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
15
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
16
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
17
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
18
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
19
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
20
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

पन्नाशी पार कर्मचाऱ्यांची फिल्डवर्कपासून सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 05:01 IST

पोलीस अधीक्षकांच्या या निर्णयाची पोलीस विभागात प्रशंसा केली जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला असून आता तर शहराच्या वेशीवर कोरोना रूग्ण आले आहेत. यामुळे शहरवासीयांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा सर्वाधिक धोका लहान मुले तसेच वयस्कांना जास्त असल्याचे सांगीतले जाते. त्यातही सर्वसामान्य माणूस आपल्या घरात राहून स्वत:ला सुरक्षीत ठेऊ शकतो.

ठळक मुद्देपोलीस अधीक्षकांचा प्रशंसनीय निर्णय । ९ वाहतूक पोलिसांचे ठाण्यांमध्ये स्थानांतरण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाचा प्रादुर्भाव त्यात वयस्कांसाठीचा धोका तसेच फिल्डमध्ये काम करताना येणारा शेकडो नागरिकांचा संपर्क बघता पोलीस अधीक्षकांनी येथील वाहतूक नियंत्रण शाखेतील ९ कर्मचाऱ्यांची फिल्डवर्कपासून सुटका करीत त्यांचे पोलीस ठाण्यांमध्ये स्थानांतरण करून कार्यालयीन कामकाजासाठी ठेवले आहे. पोलीस अधीक्षकांच्या या निर्णयाची पोलीस विभागात प्रशंसा केली जात आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला असून आता तर शहराच्या वेशीवर कोरोना रूग्ण आले आहेत. यामुळे शहरवासीयांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा सर्वाधिक धोका लहान मुले तसेच वयस्कांना जास्त असल्याचे सांगीतले जाते. त्यातही सर्वसामान्य माणूस आपल्या घरात राहून स्वत:ला सुरक्षीत ठेऊ शकतो. मात्र पोलीस खात्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ते शक्य नाही.विशेष म्हणजे, कोरोनामुळे पोलीस खात्यावरील कामाचा ताण अधिकच वाढला असून दिवसरात्री ड्यूटी त्यांना करावी लागत आहे. त्यातही वाहतूक नियंत्रण शाखेत कार्यरत कर्मचाऱ्यांना उन्हा-तान्हातही रस्त्यावर उभे राहून आपले कर्तव्य पार पाडावे लागत आहे. वाहतूक नियंत्रण शाखेतील कर्मचाऱ्यांचा नागरिकांसोबत सर्वाधिक संपर्क येतो. अशात मात्र या कडक उन्ह व नागरिकांच्या सतत संपर्कात येत असल्याने वाहतूक नियंत्रण शाखेतील कर्मचारी धोक्यात असून त्यातही पन्नाशी पार झालेल्यांना धोकाही जास्त आहे असे. हीच बाब लक्षात घेत येथील वाहतूक नियंत्रण शाखेतील पन्नाशी पार झालेल्या ९ कर्मचाऱ्यांची फिल्डवर्कपासून सुटका करवून देत त्यांचे स्थानांतरण पोलीस ठाण्यांमध्ये कार्यालयीन कामकाजासाठी करण्याचा निर्णय पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांनी घेतला.यासाठी त्यांनी गुरूवारी (दि.२८) तसे आदेश काढले. त्यानुसार, या ९ जणांना वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक दिनेश तायडे यांनी शुक्रवारी (दि.२९) विभागातून कार्यमुक्त केले असून या ९ कर्मचाऱ्यांनी आपल्या नवीन स्थळी कार्यभार हाती घेतला आहे.५ जणांची शहर तर ४ जणांची ग्रामीण ठाण्यात बदलीवाहतूक नियंत्रण शाखेत कार्यरत पन्नाशी गाठलेल्या या कर्मचाºयामध्ये ४ सहायक फौजदार, ४ पोलीस हवालदार व १ पोलीस नायक आहे. यातील ५ जणांची बदली शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तर ४ जणांची बदली ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून या ९ कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामकाज करायचे आहे. पोलीस अधीक्षक शिंदे यांच्या या निर्णयातून त्यांचा आपल्या कर्मचाºयांप्रतीचा जिव्हाळा दिसून आला असून यामुळे पोलीस विभागात त्यांच्या या निर्णयाची प्रशंसा केली जात आहे.

टॅग्स :Policeपोलिस