शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

संस्थेने केली जिल्हाधिकारी कार्यालयाची दिशाभूल

By admin | Updated: September 29, 2014 00:47 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी काम करण्यासाठी पार्वती शिक्षण विकास संस्था गोरेगावकडून सालेकसा येथील पंचायत समितीत कंत्राटी पॅनल तांत्रिक अधिकारी या पदाकरिता

सालेकसा : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी काम करण्यासाठी पार्वती शिक्षण विकास संस्था गोरेगावकडून सालेकसा येथील पंचायत समितीत कंत्राटी पॅनल तांत्रिक अधिकारी या पदाकरिता नावे मागविण्यात आली होती. सादर केलेल्या माहितीच्या आधारे उमेदवाराची शैक्षणिक अर्हता विषयक तपासणी केली असता निकषाप्रमाणे पात्र ठरत असल्याने त्यानुसार सदर कंत्राटी पॅनेल तांत्रिक अधिकारी यांचे यादीत जिल्हाधिकाऱ्यांकडून ६ सप्टेंबर २०१४ च्या कार्यवृत्रानुसार मंजुरी प्रदान करण्यात आली. त्यानुसार यादीत समाविष्ट असलेल्यांना आदेश निर्गमित करण्याबाबद निर्देश देण्यात आले होते. परंतु संस्थेकडून कंत्राटी पॅनल अधिकाऱ्यांना आदेश निर्गमित करून पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात यादी सादर करण्यात आली. पण यादीत जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी प्रदान केलेल्या यादीतील उमेदवारास आदेश न देता त्या ऐवजी शिवकुमार श्रीराम रहांगडाले यांची नियुक्ती संस्थेने केली. रहांगडाले यांनी अ‍ॅग्रीकल्चर ड्राप्समन हा आयटीआयचा व्दिवर्षीय अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे. सदर अभ्यासक्रम शासकीय परिपत्रकाप्रमाणे पूर्तता पूर्ण करीत नाही, तरीसुध्दा शिवकुमार रहांगडाले यांच्या नावाने कनिष्ठ अभियंता या पदासाठी आदेश देण्यात आले. शिवकुमार श्रीराम रहांगडाले यांनी पंचायत समिती अर्जुनी/मोरगाव येथे २१ एप्रिल २०११ ते ३० जून २०१३ या कालावधीत म.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत काम केल्याचे अनुभव प्रमाणपत्र पं.स. अर्जुनी/मोरगावचे खंडविकास अधिकारी यांच्या स्वाक्षरीचे सादर केलेले आहे. परंतु रहांगडाले यांनी मग्रारोहयो अंतर्गत जिजोबा शिक्षण संस्था, गोंदियामार्फत कनिष्ठ अभियंता या पदावर पंचायत समिती अर्जुनी/मोरगाव येथे २० एप्रिल २०१२ ते ३१ जुलै २०१२ व ०१ आॅक्टोबर २०१२ ते ३० जून २०१३ या कालावधीत फक्त काम केलेले आहे, असे प्रमाणपत्रावरून आढळून आलेले आहे. त्यामुळे रहांगडाले यांनी सादर केलेले अनुभव प्रमाणपत्रसुध्दा चुकीचे आहे, असे आढळून आलेले आहे. संस्थेने शासन परिपत्रकातील शैक्षणिक अहर्तेनुसार नियुक्ती न करता शिवकुमार श्रीराम रहांगडाले यांना अवैधरीत्या आदेश दिलेले आहेत. निकषानुसार शिवकुमार रहांगडाले हे अपात्र ठरत असून त्यांची नियुक्ती रद्द करण्यात यावी व जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता प्रदान केलेल्या उमेदवाराला कनिष्ठ अभियंता या पदावर नियुक्ती आदेश देण्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने पार्वती बहुउदेशीय विकास संस्था गोरेगावला दिलेले आहे. (तालुका प्रतिनिधी)