शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरवर मिळते केवळ ४६ रुपये सबसिडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 05:00 IST

सबसीडी देण्यापूर्वी केवळ ३५० रुपयांना गॅस सिलिंडर मिळत होता. मात्र केंद्र शासनाने सबसिडीच्या नावावर गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. ग्राहकांना प्रती गॅस सिलिंडर मागे अनुदान दिले जात असले तरी किमत वाढली असल्याने सबसिडीच स्वरुपात मिळणारी रक्कम फारच अल्प असून त्याचा फटका मात्र सर्वसामान्य ग्राहकांना बसत आहे. गॅस सिलिंडरच्या दरामध्ये दर महिन्याला चढउतार होत असल्याने गृहिणीचे बजेट सुध्दा बिगडत चालले आहे.

ठळक मुद्देदरवाढीच्या तुलनेत लाभ कमी : सर्वसामान्याना बसतोय फटका

    लाेकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्र शासनाने अनुदानित सिलिंडरवर सबसीडी देत त्याचा लाभ थेट ग्राहकाच्या बॅंक खात्यात जमा करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला गॅस सिलिंडरचे दर देखील अधिक होते. त्यामुळे दोनशे ते अडीशे रुपये सबसिडी जमा होत होती. आता गॅस सिलिंडरची किमत ६६४ रुपये असून त्यावर ४६ रुपयांची सबसिडी ग्राहकांच्या बॅंक खात्यावर जमा केली जात आहे. सबसीडी देण्यापूर्वी केवळ ३५० रुपयांना गॅस सिलिंडर मिळत होता. मात्र केंद्र शासनाने सबसिडीच्या नावावर गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. ग्राहकांना प्रती गॅस सिलिंडर मागे अनुदान दिले जात असले तरी किमत वाढली असल्याने सबसिडीच स्वरुपात मिळणारी रक्कम फारच अल्प असून त्याचा फटका मात्र सर्वसामान्य ग्राहकांना बसत आहे. गॅस सिलिंडरच्या दरामध्ये दर महिन्याला चढउतार होत असल्याने गृहिणीचे बजेट सुध्दा बिगडत चालले आहे. त्यामुळे केंद्र शासनाने गॅस सिलिंडरवर सबसीडी देण्याऐवजी पूर्वी प्रमाणेच गॅस सिलिंडरचे दर निश्चित करावे असा सूर देखील आता सर्वसामान्य ग्राहकांमध्ये उमटत आहे. 

घरपोच डिलिव्हरीसाठी १५ रुपये अतिरिक्त जिल्ह्यातील गॅस वितरकांकडून घरपोच सिलिंडर पोहचविण्यासाठी १० ते १५ रुपये ग्राहकांकडून वसूल केले जातात. नियमानुसार हे पैसे घेता येत नाही. काही ग्राहकांनी यावर आक्षेप घेतल्यास पैसे घेणे टाळले जाते.  

गॅस सिलिंडरच्या दरामध्ये नेहमी बदल होत असतो. तर सबसीडीची रक्कम थेट ग्राहकांच्या खात्यात जमा केली जात आहे. ग्राहकांच्या घरापर्यंत सिलिंडर पोहचवून देणे ही वितरकाची जबाबदारी आहे. यासाठी कुठले शुल्क आकारता येत नाही. - देविदास वानखेडे, जिल्हा पुरवठा अधिकारी

सबसीडी देण्याच्या नावावर शासनाकडून ग्राहकांना भुर्दंड बसविला जात आहे. सुरुवातीला ३५० रुपयाला मिळणाऱ्या गॅस सिलिंडरसाठी आता ६६५ रुपये माेजावे लागत आहे. त्यामुळे शासनाने यावर विचार करुन गॅस सिलिंडरचे दर कमी करण्याची गरज आहे. - संजय वानखेडे, ग्राहक

 

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडर