शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

दोन अपघातात १ ठार, १६ जखमी

By admin | Updated: April 28, 2015 23:53 IST

आठवडी बाजारातील लोकांना पिंडकेपार येथे घेऊन जाणारा आॅटो उलटून एक महिला ठार तर १३ प्रवासी जखमी झाले.

प्रवासी आॅटो उलटला : बोरगावजवळ कार झाडावर आदळलीदेवरी : आठवडी बाजारातील लोकांना पिंडकेपार येथे घेऊन जाणारा आॅटो उलटून एक महिला ठार तर १३ प्रवासी जखमी झाले. दुसऱ्या अपघातात नवीन घेतलेली फोर्ड क्लासिक कार झाडावर धडकून भागी येथील असाटी परिवारातील तिघे गंभीर जखमी झाले. हे दोन्ही अपघात बोरगावजवळ घडले.प्राप्त माहितीनुसार, मंगळवारचा आठवडी बाजार आटोपून पिंडकेपार येथील लोक आॅटोने (एमएच ४०- पी १८४३) गावाकडे जात असताना बोरगाव नाला वळणावर दुपारी २ वाजतादरम्यान त्यांचा आॅटो उलटला. क्षमतेपेक्षा जास्त म्हणजे तब्बल १४ प्रवासी त्यात भरल्याने हा आॅटो वळणावर अनियंत्रित होऊन उलटला. यात जयवंता पतिराम उईके (७५) ही वृद्धा ठार झाली. जखमींतील सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना गोंदियाला हलविण्यात आले आहे. जखमींमध्ये हरिकिशन बाबूलाल चौबे (६५, रा.देवरी), विजय उईके (३०,रा.सडक-अर्जुनी), किशोर आसाराम राऊत (२५, रा.पिंडकेपार), देवका सुंदर टेकाम (५०, रा.झुंझारीटोला), चिंतामन शिवलाल नागदेवे (५०, रा.टेकाबेदर), सीता जगन भोयर (५०, रा.बोरगाव) हे सहा प्रवासी गंभीर जखमी झाल्याने त्यांना गोंदियाला हलविण्यात आले. याशिवाय श्रीकांत देवीराम उईके (१८, रा.चिखली), ललीता चिंतामन नागदेवे (४०, रा.टेकाबेदर), राजू जयपाल नाईक (४, रा.पींडकेपार), प्रशांत प्रकाश रामटेके (२७, रा. टेकाबेदर), मच्छींद्र सोनवाने (५०, रा.सुब्रायटोला), अंजना सुनील घासले (३५, रा.पींडकेपार), माया विजय उईके (२७, रा.सडक-अर्जुनी) या सात प्रवाशांना किरकोळ मार लागल्याने त्यांच्यावर ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याने हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे येथील ग्रामीण रूग्णालयात दोन रूग्णवाहीका असून त्यातील एक नादुरूस्त असल्याने एकच रूग्णवाहीका चालू आहे. त्यामुळे दुसऱ्या एका खाजगी वाहनातून जखमींना गोंदियाला हलवावे लागले. भागी येथील अभागी असाटी कुटुंबनवीन घेतलेल्या कारचा आनंद भागी गावच्या असाटी कुटुंबियांना नियतीने पाहू दिला नाही आणि त्या अभागी ठरलेल्या कुटुंबावर काळाचा आघात झाला. भरधाव वेगात असलेली त्यांची कार ३ किमी अंतरावर असलेल्या बोरगाव येथे झाडावर आदळली. हा अपघात सोमवारी (दि.२७) रात्री ११ वाजतादरम्यान घडला. तीनपैकी एका जखमीची प्रकृती चिंताजनक असून त्यांना नागपूरला हलविले आहे. प्राप्त माहितीनुसार, ग्राम भागी येथील असाटी बंधुंनी नवीन फोर्ड क्लासिक कार खरेदी केली होती. सोमवारी (दि.२७) गोंदियाच्या आरटीओ कार्यालयात कार पासिंग करून व बाजारात इतर साहित्याची खरेदी करून ते गावी परत येत असताना रात्री ११ वाजतादरम्यान भरधाव वेगात असलेली त्यांची कार झाडाला धडकली.ही धडक एवढी जबर होती की कारचा समोरचा भाग पूर्णपणे क्षतिग्रस्त झाला. कारमध्ये बसलेले राकेश नर्मदाप्रसाद असाटी (३९), नितेश नर्मदाप्रसाद असाटी (३६) व शैलेश नर्मदाप्रसाद असाटी (२८) हे तिघे जखमी झाले. गावकऱ्यांच्या मदतीने त्यांना देवरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. कारच्या भागच्या सीटवर बसलेले सर्वात मोठे भाऊ राकेश यांच्या डोक्यावर जास्त मार असल्याने त्यांना लगेच नागपूरला हलविण्यात आले. शैलेष देवरीमध्ये असून नितेशला गोंदियाला हलविण्यात आले आहे. नितेश व शैलेश हे समोरच्या सीटवर सेफ्टी बेल्ट लावून बसले असल्यामुळे ते बचावले असल्याचे सांगण्यात येत आहे. (प्रतिनिधी)