चुंबली नदीत नाव उलटून एकाचा मृत्यू, देवरी तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2022 12:47 IST2022-01-17T12:45:41+5:302022-01-17T12:47:56+5:30

चुंबली गावाला जाण्यासाठी नदीवर पूल नसल्याने येथील गावकरी नावेने ये-जा करतात. दरम्यान नदीत नाव उलटल्याने नदीत बुडून मंसाराम अलोणे यांचा मृत्यू झाला.

One dies after boat capsizes in chumbli river | चुंबली नदीत नाव उलटून एकाचा मृत्यू, देवरी तालुक्यातील घटना

चुंबली नदीत नाव उलटून एकाचा मृत्यू, देवरी तालुक्यातील घटना

गोंदिया : देवरी तालुक्यातील चुंबली नदीत नाव उलटून एक ५५ वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.१७) सकाळी उघडकीस आली. मंसाराम मंगू अलोने (५५) रा. चुंबली असे नाव उलटून मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

चुंबली गावाला जाण्यासाठी नदीवर पूल नसल्याने येथील गावकरी नावेने ये-जा करतात. दरम्यान नदीत नाव उलटल्याने नदीत बुडून मंसाराम अलोणे यांचा मृत्यू झाला. स्थानिक नावाडी आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या चमूच्या मदतीने मृतदेहाचा शोध घेवून मृतदेह बाहेर काढण्यात आला.

Web Title: One dies after boat capsizes in chumbli river