शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
2
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
3
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
4
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
5
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
6
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
7
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
8
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
9
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
10
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
11
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
12
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
13
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
14
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
15
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
16
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
17
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
18
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
19
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
20
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात१२ हजार २२० हेक्टरमध्ये रोपवाटिका

By admin | Updated: June 28, 2014 01:06 IST

जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने संपूर्ण जिल्ह्यात आतापर्यंत १२ हजार २२० हेक्टर क्षेत्रात धानाची रोपवाटिका तयार करण्यात आल्याची नोंद घेतली आहे.

देवानंद शहारे गोंदिया
जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने संपूर्ण जिल्ह्यात आतापर्यंत १२ हजार २२० हेक्टर क्षेत्रात धानाची रोपवाटिका तयार करण्यात आल्याची नोंद घेतली आहे. अधूनमधून वातावरण ढगाळलेले असते. परंतु १८ जून नंतर पाऊस पडले नाही. यानंतर २७ जूनला पहाटे जिल्ह्यात काही प्रमाणात पाऊस पडले. त्यामुळे सदर रोपवाटिका जिवंत राहण्यास थोडीफार मदत झाल्याने शेतकरी थोडक्यात सुखावला आहे.
गतवर्षी जिल्ह्यात धान पिकाचे सरासरी क्षेत्र एक लाख ८४ हजार ९०० हेक्टर होते. एवढ्या क्षेत्रात मागील वर्षी धानाचे पीक लावण्यात आले होते. तर याच्या १० टक्के क्षेत्रात रोपवाटिका तयार करण्यात आली होती. यंदा कृषी विभागाने एक लाख ९० हजार हेक्टर क्षेत्रात जिल्ह्यात भातपीक लागवडीचे नियोजन केले आहे. याच्या १० टक्के क्षेत्रात म्हणजे १९ हजार हेक्टर क्षेत्रात रोपवाटिका यंदा तयार होणे अपेक्षित होते. मात्र पाऊस पडत नसल्याने काही शेतकऱ्यांनी धानाची रोपवाटिका लावण्यास सध्या अनुत्सुकता दाखविल्याचे दिसून येते.
मागील आडवड्यात १८ जून रोजी पाऊस पडला होता. त्यानंतर पाऊस न पडल्याने शेतकरी त्रस्त झाले होते. तीव्र उन्ह पडत होते व रोपवाटिकेला पाण्याची गरज होती. त्यामुळे रोपवाटिका नष्ट तर होणार नाही ना? शारीरिक श्रम व आर्थिक फटका सहन करून दुबार पेरणीचे संकट तर ओढावणार नाही? अशा शंकाकुशंकांनी शेतकऱ्यांना पछाडले होते. मात्र २७ जूनच्या पहाटे थोड्या प्रमाणात आलेल्या पावसाने त्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. २७ जूनला दिवसभर ढगाळलेले वातावरण होते. मात्र पाऊस सायंकाळपर्यंत पडला नसल्याने पुन्हा शेतकऱ्यांना निराशेने घेरण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
सन २०१३ मध्ये २६ जूनपर्यंत जिल्ह्यात एकूण २८२४.१ मिमी पाऊस पडले होते. मात्र यंदा २६ जूनपर्यंत जिल्ह्यात ५६३.१ मिमी पाऊस पडले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल २,२६१ मिमी पाऊस जिल्ह्यात कमी पडले.
याशिवाय यंदा पाऊस कमी प्रमाणात पडण्याची शक्यतासुद्धा कृषी विभागाने वर्तविली आहे. या प्रकारांमुळे काही शेतकऱ्यांनी आतापर्यंत धान बियाण्यांची पेरणीसुद्धा केली नाही. मात्र पुन्हा आठ-दहा दिवस पाऊस पडले नाही तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावणार, ऐवढे मात्र नक्की.