शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

न.पं. अध्यक्षपदाची निवडणूक २७ ला?

By admin | Updated: November 18, 2015 01:56 IST

जिल्ह्यातील चार नगर पंचायतींच्या पहिल्यावहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्याही पक्षाला मतदारांनी स्पष्ट कौल दिला नाही.

उत्सुकता शिगेला : गोरेगाव, देवरीत रहस्य कायमगोंदिया : जिल्ह्यातील चार नगर पंचायतींच्या पहिल्यावहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्याही पक्षाला मतदारांनी स्पष्ट कौल दिला नाही. त्यामुळे कोणती नगर पंचायत कोण काबीज करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या २६ किंवा २७ नोव्हेंबरला अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.नगर पंचायतींच्या अध्यक्षपदाची आरक्षण सोडत मुंबईत दि.९ ला निघाली. त्यानंतर २५ दिवसांच्या आत अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवडणूक घेणे बंधनकारक आहे. त्यादृष्टीने ही निवडणूक घेण्यासाठी अजून बराच कालावधी शिल्लक असला तरी नगर पंचायतींचा कारभार लवकर मार्गी लागावा आणि रखडलेली कामे पुन्हा सुरू व्हावी यासाठी पदाधिकारी सत्तारूढ होणे गरजेचे आहे. त्यामुळे ही निवडणूक लवकर घेण्यासाठी जिल्हा प्रशासन तयारीला लागले आहे. बुधवारी (दि.१८) याबाबतची तारीख निश्चित होण्याची शक्यता आहे.‘अ’ वर्ग नगर पालिकेला लागू असलेले सर्व नियम या क वर्ग नगर पंचायतींना लागू राहणार आहेत. त्यामुळे सुरूवातीला अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड केल्यानंतर दुसऱ्या सभेत विषय समित्यांच्या सभापतींची आणि नामनिर्देशित सदस्यांची निवड केली जाणार आहे. चारपैकी तीन नगर पंचायतींवर महिला सदस्य अध्यक्षपदी विराजमान होणार आहे. त्यात अर्जुनी मोरगाव येथे अनुसूचित जाती महिला, सडक अर्जुनी अनुसूचित जाती (सर्वसाधारण), देवरीत नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, तर गोरेगावात खुल्या प्रवर्गातील महिला नगर पंचायत अध्यक्षपदी विराजमान होणार आहे. कोणाकडेही स्पष्ट बहुमत नसल्यामुळे कोणत्याही दोन किंवा तीन पक्षांना एकत्रित येऊनच सत्ता मिळवावी लागणार आहे. यात सर्वच ठिकाणी अपक्षांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)