शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
3
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
4
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
5
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
6
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
7
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
8
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
9
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
10
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
11
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
12
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
13
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
14
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
15
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
16
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
17
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
18
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
19
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
20
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
Daily Top 2Weekly Top 5

आता आम्ही आमच्या गावाचे रक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 06:00 IST

कोरोनाचा झपाट्याने प्रादुर्भाव वाढत असल्याने शासन आणि प्रशासनातर्फे उपाय योजना केल्या जात आहे. देशात सर्वत्र संचारबंदी लागू करुन नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले जात आहे. तर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी सुध्दा यासाठी आता पुढाकार घेतला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यातील पाच गावांनी गाव बंदीचा निर्णय घेतला. तसेच गावकऱ्यांची परवानगी न घेता गावात प्रवेश करणाऱ्यांना अडीच हजार रुपयांच्या दंडाची सुध्दा तरतूद केली आहे.

ठळक मुद्देकोरोनाचा प्रादुर्भाव : गावकऱ्यांचा गावबंदीचा निर्णय

लालसिंह चंदेल।लोकमत न्यूज नेटवर्कपांढरी : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासन आणि प्रशासनाकडून युध्द स्तरावर उपाय योजना केल्या जात आहे. त्यात आता ग्रामीण भागातील ग्रामपंचायती सुध्दा पुढे येत आहे. कोरोनाचा आपल्या गावामध्ये शिरकाव होऊ नये म्हणून आता गावकऱ्यांनी गाव बंदीचा निर्णय घेत आहे. तर काही ग्रामपंचायतीनी गाव दक्षता समित्या स्थापन करुन गावाच्या प्रवेशाव्दारावर ग्राम रक्षकांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात आता आम्हीच आमच्या गावाचे रक्षक असे चित्र आहे.कोरोनाचा झपाट्याने प्रादुर्भाव वाढत असल्याने शासन आणि प्रशासनातर्फे उपाय योजना केल्या जात आहे. देशात सर्वत्र संचारबंदी लागू करुन नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले जात आहे. तर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी सुध्दा यासाठी आता पुढाकार घेतला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यातील पाच गावांनी गाव बंदीचा निर्णय घेतला. तसेच गावकऱ्यांची परवानगी न घेता गावात प्रवेश करणाऱ्यांना अडीच हजार रुपयांच्या दंडाची सुध्दा तरतूद केली आहे. ऐवढेच नव्हे तर गावात कोणतेही वाहन अथवा बाहेरील नागरिक प्रवेश करु नये यासाठी गावाच्या प्रवेशव्दारावर लाकडे आणि झाडाच्या फांद्या टाकून मार्ग अडविण्यात आला आहे. तर सडक अर्जुनी तालुक्यातील डुंडा आणि पांढरी येथे गावकऱ्यांनी गाव दक्षता समितीची स्थापना करुन ग्राम सुरक्षा रक्षकाची नियुक्ती केली आहे. गावातील युवक पाळी पाळीने गावाच्या प्रवेशाव्दारा पहारा देत असून गावाबाहेरील व्यक्तीस गावात प्रवेश करण्यास मज्जाव करीत आहे. तर असाच निर्णय देवरी तालुक्यातील लोहारा ग्रामपंचायतने सुध्दा गावातील युवकांची ग्रामरक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. हे युवक गावाच्या प्रवेशव्दारावर दिवसभर पहारा देत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात आता आम्हीच आमच्या गावाचे रक्षक ही संकल्प रुढ होत असल्याचे चित्र आहे. ही सर्व उपाय योजना आपल्या गावातील नागरिकांचे आरोग्य सदृढ राहावे,त्यांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी आहे.त्यामुळे गावकरी देखील यात सहकार्य करीत असल्याचे चित्र आहे.गावांमध्ये सॅनिटायझेशन फवारणी करण्यास सुरूवातकोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आता ग्रामपंचायतीने सुध्दा पुढाकार घेतला आहे.गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी ग्रामपंचायतीने गावात सॅनिटायझरची फवारणी करण्यास सुरूवात केली आहे. शुक्रवारी जिल्ह्यातील केशोरीसह अनेक ग्रामपंचायतीने गावात सॅनिटायझर आणि डासनाशक फवारणी केली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसgram panchayatग्राम पंचायत