शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

आता तरी घरातच रहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 06:00 IST

अवघ्या जगातच कोरोनाने थैमान घातले आहे. त्याची झळ आता देशालाही पोहचू लागली असून दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. देशात कोरोना येताच व त्याचे दुष्परिणाम बघता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि.२२) ‘जनता कर्फ्यू’ पुकारला होता. त्याला देशवासीयांनी भरभरून प्रतिसाद दिला. मात्र अशातही काही समाजकंटकानी घराबाहेर निघून पंतप्रधानांच्या विनंतीलाही मान दिला नाही. परिणामी रस्त्यावर थोडीफार का असोना मात्र वर्दळ दिसून येत होती.

ठळक मुद्देगोंदियात माजली खळबळ। प्रत्येकाने गांभीर्याने घेण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाच्या पासून आतापर्यंत सुटलेल्या गोंदिया जिल्ह्यातही शुक्रवारी (दि.२७) एक रूग्ण आढळून आल्याने चांगलीच खळबळ माजली आहे. अशातही मात्र नागरिकांना याबाबत गांभीर्य जाणवत नसल्याचे दिसून येत आहे. मात्र ही बाब अतीशय गंभीर असल्याने आता तरी घरात रहा असे आवाहन सर्वच स्तरातून केले जात आहे.अवघ्या जगातच कोरोनाने थैमान घातले आहे. त्याची झळ आता देशालाही पोहचू लागली असून दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. देशात कोरोना येताच व त्याचे दुष्परिणाम बघता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि.२२) ‘जनता कर्फ्यू’ पुकारला होता. त्याला देशवासीयांनी भरभरून प्रतिसाद दिला. मात्र अशातही काही समाजकंटकानी घराबाहेर निघून पंतप्रधानांच्या विनंतीलाही मान दिला नाही. परिणामी रस्त्यावर थोडीफार का असोना मात्र वर्दळ दिसून येत होती. स्वत:ला एक दिवस घरात ठेवायला तयार नसलेल्या नागरिकांना चपराक म्हणून कोरोनाचे रूग्ण वाढूच लागले आहे.याची दखल घेत आता पंतप्रधानांनी अवघ्या देशातच बुधवारपासून (दि.२५) ‘लॉकडाऊन’ करून टाकले आहे. मात्र अशा या समाज विघातक नागरिकांकडून त्याचीही अंमलबजावणी केली जात नसल्याचे दिसत आहे. सकाळपासूनच थोड्याफार प्रमाणात का असोना नागरिक रस्त्यावर फिरताना दिसतच आहेत.आतापर्यंत जिल्हावासी एकही रूग्ण न मिळाल्याने स्वत:ला सुखरूप मानत होते. मात्र शुक्रवारी (दि.२७) अचानकच एक रूग्ण आढळून आल्याने सर्वांची धाकधूक वाढली आहे. आता काय करावे असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. मात्र तरिही कमी का असोना घराबाहेर निघणारे दिसूनच येत आहेत. अशात आता तरी खबरदारी म्हणून आपापल्या घरात रहा असे आवाहन सर्वच स्तरातून केले जात आहे.पोलिसांना सहकार्य कराआरोग्य व पोलीस कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून सर्वांच्या जीवासाठी झटत आहेत. आपले कुटुंब घरी सोडून ते नागरिकांना सेवा देत आहेत. त्यांच्या या कार्याला सलाम करीत त्यांचे आवाहन पाळण्याचे सोडून आताही नागरिक विनाकारण रस्त्यावर दिसत आहेत. तुमच्यासाठी आपला जीव धोक्यात घालणाऱ्या त्या पोलिसांना सहकार्य करण्याची गरज असून यासाठी जास्त काही नाही तर फक्त आपापल्या घरात राहायचे आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस