शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
13
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
14
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
15
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
16
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
17
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाविरुध्दच्या लढ्यासाठी आता अँटीजेन रॅपिड टेस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 05:00 IST

शहरातील कुंभारेनगर परिसरात कोरोना बाधित रुग्ण आढळले होते. सध्या या भागात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने या भागात मागील पाच दिवसांपासून अँटिजेन रॅपिड टेस्ट सुरू केली आहे.

ठळक मुद्देआणखी दहा हजार किट मागविल्या : तपासणीचे प्रमाण वाढविणार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने युध्द पातळीवर उपाययोजना सुरू केल्या आहेत. याच अंतर्गत मागील पाच दिवसांपासून जिल्हा अँटीजेन रॅपिड टेस्ट सुरू करण्यात आली आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात दीड हजार टेस्ट किट मागविण्यात आल्या होत्या. या टेस्टचे प्रमाण वाढवून कोरोनाला हरविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आणखी १० हजार अँटीजेन रॅपिड टेस्ट किट मागविण्यात आल्याची माहिती आहे.शहरातील कुंभारेनगर परिसरात कोरोना बाधित रुग्ण आढळले होते. सध्या या भागात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने या भागात मागील पाच दिवसांपासून अँटिजेन रॅपिड टेस्ट सुरू केली आहे. सुरूवातीला कुंभारेनगर येथे प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प रावबून त्यानंतर याची जिल्हाभरात अंमलबजावणी करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी अधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी घेतला आहे. अँटीजेन रॅपिड टेस्टव्दारे कोरोनाचे अर्धा तासात निदान होत आहे. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांवर त्वरीत उपचार करुन कोरोनाचा वाढता संसर्ग टाळणे शक्य आहे. त्यामुळेच जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने पहिल्या टप्प्यात दीड हजार अँटीजेन रॅपिड टेस्ट किट मागविल्या होत्या. आतापर्यंत ७०० जणांची अँटीजेन रॅपिड किटच्या माध्यमातून कोरोनाची चाचणी करण्यात आली आहे. तर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी या टेस्टचे प्रमाण वाढविण्यात येणार आहे. यासाठी आणखी १० हजार अँटीजेन रॅपिड किट आरोग्य विभागाने मागविल्या आहे. येत्या आठवडभरात या किट प्राप्त होणार असून त्यानंतर ही तपासणी मोहीम अधिक व्यापक स्वरुपात राबविण्यात येणार आहे. कोरोना विरुध्दच्या लढ्यासाठी आता अँटीजेन रॅपिड टेस्टचे शस्त्र हाती घेण्यात आले असून या माध्यमातून कोरोनाला जिल्ह्यातून पूर्णपणे हद्दपार केले जाणार आहे.अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत जिल्ह्याची स्थिती बरीजिल्ह्यात आतापर्यंत एकूण २३१ कोरोना बाधित आढळले आहे. यापैकी १९९ कोरोना बाधित कोरोनामुक्त होवून आपल्या घरी परतले आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या स्थितीत केवळ २९ कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्ण आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यात जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाला बऱ्याच प्रमाणात यश आल्याचे चित्र आहे. तर इतर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेता जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या