शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar : "उद्धव ठाकरे लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का?"; आशिष शेलारांचा खोचक सवाल
2
दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट! सोमवारी दुपारी लागणार निकाल, असा पाहा रिझल्ट
3
Fact Check: अमित शाह म्हणाले की, निवडणुकीत गॅरंटी दिल्यानंतर मोदी विसरतात?; 'तो' Video अपूर्ण
4
Hardik Pandya Divorce: नताशाला ७०% संपत्ती अन् 'कंगाल' पांड्या; हार्दिकबद्दल का रंगतेय चर्चा?
5
तुम्हीच ठरवा कोण जिंकतेय...! योगेंद्र यादवांच्या २६० च्या दाव्यावर प्रशांत किशोरांची प्रतिक्रिया, म्हणाले...
6
'वर्षभरापासून मी बेरोजगार आहे कारण...' रत्ना पाठक शाहांनी सांगितलं सत्य
7
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
8
निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या घरात चोरट्यांचा दरोडा, विरोध केल्याने पत्नीची हत्या
9
Gold Rates Today : ३ दिवसांत सोनं ₹२००० नं झालं स्वस्त, पाहा २४ कॅरेट Goldचा आजचा भाव
10
Fact Check: मनोज तिवारींनी लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
11
छत्तीसगड: दारुगोळा कारखान्यात भीषण स्फोट; 9 जणांचा मृत्यू झाल्याची भीती
12
मराठमोळ्या देवदत्त नागेचं नशीब उजळलं, थेट राजामौलींच्या सिनेमात चमकणार!
13
दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर चालू ट्रकमधील सामानाची चोरी; धाडस पाहून लावाल डोक्याला हात
14
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
15
पाणी कसे वाचवावे? महापालिकेने दिल्या मुंबईकरांना टिप्स; शॉवर बंद, नळ सुरु ठेवून दात घासणे, दाढी करणे टाळा
16
हृदयद्रावक! वडिलांच्या तेराव्यासाठी आलेल्या मुलाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
17
Vodafone Ideaच्या शेअरमध्ये ७% तेजी, एक्सपर्ट बुलिश; गुंतवणूकदारांच्याही उड्या
18
दुसऱ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध, दलजीत कौरच्या घटस्फोटाचं कारण समोर; म्हणाली...
19
स्टार प्रवाह वाहिनीवरील या दोन लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप
20
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत

ना औषधी; ना टाक्याचा धागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 1:05 AM

गरीब गर्भवतींना जीवनदान देणारी गंगाबाईची हालत अधिकाºयांमुळे बकाल झाली आहे. बाई गंगाबाई रुग्णालय विविध समस्यांनी घेरली असली तरी येथील सर्वात मोठी समस्या औषधांची आहे. प्रसूतिसाठी लागणारी कसलीही औषधी उपलब्ध नाही.

ठळक मुद्दे १३०० रूपयांचा फटका : औषधी बाहेरून आणण्याचा अधिकृत सल्ला

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गरीब गर्भवतींना जीवनदान देणारी गंगाबाईची हालत अधिकाºयांमुळे बकाल झाली आहे. बाई गंगाबाई रुग्णालय विविध समस्यांनी घेरली असली तरी येथील सर्वात मोठी समस्या औषधांची आहे. प्रसूतिसाठी लागणारी कसलीही औषधी उपलब्ध नाही. मागील दोन महिन्यांपासून औषधी नसल्याने प्रसूतिसाठी गंगाबाईत येणाºया महिलांना १३०० रूपयांची औषधी खासगी मेडीकल मधून खरेदी केल्याशिवाय त्यांची प्रसूतीच केली जात नाही.जिल्ह्यातील गरिब गर्भवती महिला व बालकांना आधार देणारे केंद्र म्हणून बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयाचे नाव घेतले जाते. गरीबीमुळे प्रसूती खासगी रूग्णालयात करण्यास असमर्थ ठरणाºया महिलांना बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात दाखल केले जाते. परंतु, या रूग्णालयात शासनाकडून औषधचा पुरवठा होत नसल्याने प्रसूतीसाठी आलेल्या महिलांसाठी १२०० ते १३०० रूपयापर्यंतची औषधी बाहेरून आणण्यास भाग पाडले जाते. बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात दररोज २० सामान्य तर ८ शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती केली जाते. ज्याना कुणाचा आधार नाही. गरिबीत जीवन जगणाºया महिलांना बाई गंगाबाई रुग्णालयाचा मोठा आधार आहे. परंतु, औषधे नसल्यामुळे त्यांच्यावर १३०० रूपयांचा आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. या संदर्भात काही नातेवाईक आरोग्य प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त करीत आहेत.७५ वर्षाची असेलेले बाई गंगाबाई स्त्री रूग्णालय मेडीकल कॉलेजच्या हस्तेक्षेपामुळे मोडकळीस आले आहे. सन २०११ पासून या बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयाला २०० खाटांचा दर्जा देण्यात आला. परंतु सहा वर्षाचा कालावधी लोटूनही या रूग्णालयात २०० खाटा आल्याच नाही. आज घडीला या रूग्णालयात फक्त १३५ खाटा आहेत. त्याही खाटा ठेवण्यासाठी जागा नाही.२०० खाटांचा दर्जा मिळताच गंगाबाईच्या बाजूला कर्मचाºयांची वसाहत होती त्या ठिकाणी नविन वॉर्ड तयार करण्यात आले होते. परंतु त्या वॉर्डावर मेडीकल कॉलेजचे अतिक्रमण झाल्याने फक्त १३५ खाटांवरच गंगाबाईला समाधान मानावे लागले.दररोज ४० रूग्ण खाटांविनागंगाबाईला दर्जा २०० खाटांचा असला तरी प्रत्यक्षात १३५ खाटा उपलब्ध आहेत. गंगाबाईत दररोज १७५ ते १९० च्या घरात रूग्ण असतात. त्यामुळे ४० ते ५० रूग्णांना खाटा मिळत नाही. १५ आॅगस्ट रोजी गंगाबाईत १७५ रूग्ण, १६ आॅगस्ट रोजी १८६ रूग्ण तर १७ आॅगस्ट रोजी १९० रूग्ण गंगाबाईत दाखल होते. दररोज ४० ते ५० रूग्णांना खाटांची गरज असते. त्यामुळेइतर रूग्णांच्या बेडवर त्यांना पाठविले जाते.याचाच फायदा काही लोक घेतात. बेड मिळवून देण्याच्या नावावर रूग्णांची लुबाडणूकही केली जाते.गंगाबाईत दोन महिन्यांपासून या औषधांचा तुटवडा१) सामान्य प्रसूतीसाठी :- मॅग्नेशियम सल्फेट, बिटाडेन सोल्यूनम, बिटाडेन आर्इंटमेंट, पीटासीन, प्रोस्टोडीन, सर्व्हीप्राईल जेल, मिझोप्रॉस्ट टॅबलेट, झायलोकेन, कॅटगट नंबर १,इंजेक्शन ड्रोटीन, बस्कोपॅन, इपीडोसीन ही औषधे नाहीत.२)शस्त्रक्रियेसाठी लागणारी औषधे :- शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती झाल्यानंतर लागणाºया साध्या अ‍ॅन्टीबायटीक औषधे उपलब्ध नाहीत. शस्त्रक्रिया करण्यासाठी लागणारी औषधे, इंजेक्शन व इतर साहित्य नाहीत. अ‍ॅनाव्हीन, कॉर्ड क्लम्प, बेबीसीट, इथीलॉन २-०, कॅटगट नंबर १, आॅन निडल, बिटाडीन सोल्यूनम, इंजेक्शन झायलोकेन, मॅक्सेल्फ, पिटोसीन, केटाडीन, मेट्रो, टॅक्सीम, सिप्रो, सेफ्रेयाझोन, एमपीसिलीन, पिपरासीलॉन औषधे नाहीत.३) शस्त्रक्रियेनंतर लागणारी औषधे: रेनटॅक, डायक्लो, डॅक्सीन, इमीसिलीन, सेफ्ट्रीयाकझोन, पिपरासीलीन, अ‍ॅझोबॅकटम, बिटाडीन सोल्यूनम ही औषधे नाहीत.४) नवजात बालकांची औषधे :- नवजात बालकांसाठी लागणाºया औषधात इंजेक्शन रेनटॅक, एमपीसीलीन, फेनोबार, सिफोटॅक्झीन, फ्लुकोनाझोन, इंजेक्शन डोपामीनल डोब्यूटामीन, लॅक्सीस थ्रीनेक्यानुला, २४ क्रमांकाचे जेलको, २६ क्रमांकाचे जेलको ही औषधे उपलब्ध नाहीत.डिसेंबर पासून औषधांसाठी निधी आला नाही. दीड कोटी रूपये औषधांचे घेणे बाकी आहेत. यासंदर्भात आरोग्य संचालक व आरोग्य सचिव यांच्याशी चर्चा केल्यावर त्यांनी आपल्या स्तरावर उधारीवर औषधे घ्या असे सूचविले आहेत. आता थोडी-थोडी औषधे खरेदी करीत आहोत. निधी अभावी औषधे नाहीत.-व्ही. पी. रूखमोडेवैद्यकीय अधिष्ठाता मेडीकल कॉलेज गोंदिया.