शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

डेल्टा प्लसच्या पार्श्वभूमीवर नवीन निर्बंध आजपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 05:00 IST

कोरोनाच्या डेल्टा प्लसचा प्रादुर्भाव वाढू नये तसेच पूर्णपणे लॉकडाऊनची वेळ जनतेवर येऊ नये यासाठी सुरुवातीपासून खबरदारी घेतली जात आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता कमी असली तरी डेल्टा प्लसचे रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, ही वेळच येऊ न देण्यासाठी राज्य शासनाने सर्व जिल्ह्यात निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी आज, सोमवारपासून केली जाणार आहे.

ठळक मुद्देजीवनावश्यक वस्तूंची दुकाने राहणार सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शासनाने आज, सोमवारपासून (दि. २८) सर्व जिल्ह्यांना तिसऱ्या स्तरात समाविष्ट करून निर्बंध लागू केलेे आहेत. याअंतर्गत आजपासून सर्वच दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ या वेळेत सुरू राहणार आहेत, तर शनिवार आणि रविवार या वीकेंडला जीवनावश्यक वस्तू आणि भाजीपाल्याची दुकाने सुरू राहणार आहेत. कोरोनाच्या डेल्टा प्लसचा प्रादुर्भाव वाढू नये तसेच पूर्णपणे लॉकडाऊनची वेळ जनतेवर येऊ नये यासाठी सुरुवातीपासून खबरदारी घेतली जात आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता कमी असली तरी डेल्टा प्लसचे रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, ही वेळच येऊ न देण्यासाठी राज्य शासनाने सर्व जिल्ह्यात निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी आज, सोमवारपासून केली जाणार आहे. यासंबंधीचे आदेशदेखील जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. त्यानुसार साेमवार ते शुक्रवार या कालावधीत सर्व दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ या वेळेत सुरू राहतील, तर शनिवारी आणि रविवारी जीवनावश्यक वस्तू आणि भाजीपाल्याची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद राहणार आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी नगर परिषद आणि महसूल विभागाची पथकेसुद्धा कार्यान्वित राहणार आहेत. नियमांचे पालन न करणाऱ्यावर दंडात्मक व फौजदारी कारवाई केली जाणार आहे.

जिल्ह्यात डेल्टा प्लसच्या एकाही रुग्णाची नोंद नाही जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाच्या डेल्टा प्लस या आजाराच्या एकाही रुग्णाची नोंद झालेली नाही. मात्र, या आजाराचा संसर्ग असलेल्या जिल्ह्यांतून जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांवर प्रशासनाची नजर आहे. डेल्टा प्लसचा प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यांतील प्रवासी गोंदिया जिल्ह्यात आल्यास त्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.आठवडी बाजाराचा आदेश दोन दिवसांतच रद्द जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असल्याने जिल्हा प्रशासनाने दोन दिवसांपूर्वीच जिल्ह्यातील सर्व आठवडी आणि गुरांचे बाजार सुरू करण्याचे आदेश काढले होते. मात्र, डेल्टा प्लसच्या पार्श्वभूमीवर नवीन निर्बंध लागू झाल्याने हे आदेश रद्द करण्यात आले.  

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या